“फाळणी वेदना स्मृतीदिन” आणि स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन येथे आजपासून तीन दिवसीय प्रदर्शनाचा प्रारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 15, 2023

“फाळणी वेदना स्मृतीदिन” आणि स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन येथे आजपासून तीन दिवसीय प्रदर्शनाचा प्रारंभ

 फाळणी वेदना स्मृतीदिन आणि स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर

रेल्वे स्टेशन येथे आजपासून तीन दिवसीय प्रदर्शनाचा प्रारंभ


प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असणार

सोलापूर,  (कटूसत्य वृत):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठया उत्साहाने साजरा करत असताना आपल्याला १४ ऑगस्ट १९४७ रोजी घडलेल्या फाळणीच्या वेदना देखील मनाला खिन्न करून जातात. देशाला भोगाव्या लागलेल्या  फाळणीच्या  वेदना कधीही विसरता येणार नाहीत. द्वेष आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू भगीनींना विस्थापित व्हावे लागलेआपला जीव गमवावा लागला. आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा "फाळणी वेदना स्मृती दिन" म्हणून देशभर पाळला जात आहे. असे प्रतिपादन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले. 

     फाळणी वेदना स्मृतीदिन, हर घर तिरंगामेरी माटी मेरा देश आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोसोलापूर व मध्‍य रेल्‍वे सोलापूर विभाग यांच्या संयुक्‍त विद्यमाने भारत-पाक फाळणीत घडलेल्या घटना, घडामोडी आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या महत्वपूर्ण घटनाऐतिहासिक स्थळेज्ञात व अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या दुर्मिळ चित्रांचे मल्टीमीडिया प्रदर्शन रेल्वे स्टेशन येथे भरविण्यात आले आहे. चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार डॉ.महास्वामी बोलत होते.

       यावेळी हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रेय हिबारेविभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे, निवृत्त कर्नल एल एम साठे,  क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाणवरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक लक्ष्मण रणयेवलेवरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी जी पी भगतविभागीय सुरक्षा अधिकारी शिवाजी कदमविभागीय कार्मिक अधिकारी मचिंद्र गळवेनिवृत्त सुभेदार मेजर नरेंद्र देवमाजी सैनिक अरुणकुमार तळीखेडे,  माजी सैनिकांचे कुटुंबीय आशा कवडेविभागीय रेल्वे सुरक्षा बल अधिकारी एस एस संसारेसहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादवनिवृत्त अधिकारी सतीश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

    डॉ. महास्वामी म्हणाले कीभारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त लावण्यात आलेले दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यामध्ये बलिदान दिलेल्या थोर व्यक्तींना या निमित्ताने अभिवादन करतो. देशातील अतिशय दुर्मिळ छायाचित्रांचे हे प्रदर्शन असून सर्व नागरिकांनी आवर्जून पहावे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज सामाजिकआर्थिकशैक्षणिकसांस्कृतिक, विज्ञानतंत्रज्ञान, पायभूत बांधणी,  आणि क्रीडा यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये देश प्रगती करत आहे. भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याची जबाबदारी आपल्या सर्वावर आहे. आपल्याला भेदभाववैमनस्य आणि द्वेषभावनेच्या विषाला संपवण्यासाठी प्रेरित करण्या बरोबरच एकतासामाजिक सद्‌भावना आणि मानवीय संवेदनाही सशक्त करायचा आहेत. सोलापूर रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या प्रदर्शनीला प्रत्येक सोलापुराकारानी येऊन बघण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.      

     श्री दोहरे म्हणाले15 ऑगस्ट ,1947 रोजी भारताने  ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवले. स्वातंत्र्य दिन हा कोणत्याही राष्ट्रासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा प्रसंग असतोमात्रस्वातंत्र्याच्या गोडव्यासह  फाळणीचे दुःखही येते.  नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतीय राष्ट्राच्या जन्माबरोबरच  फाळणीच्या हिंसक वेदनाही होत्या ज्यांनी लाखो भारतीयांवर कायमचे वेदना सोडले आहेत. फाळणीमुळे मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या स्थलांतरांमुळे सुमारे 20 दशलक्ष लोक प्रभावित झाले. लाखो कुटुंबांना त्यांची वडिलोपार्जित गावे/शहरे सोडावी लागली आणि त्यांना निर्वासित म्हणून नवीन आयुष्य शोधावे लागले असे त्यांनी सांगितले.     स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेले हे प्रदर्शन युवा पिढीसाठी उपयुक्त आहेस्वातंत्र्य काळातील त्यागबलिदानअत्याचार या इतिहासाची आठवण सर्वांना व्हावीया उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहेया प्रदर्शनाबरोबर फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्तच्या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या दुर्मिळ चित्रांची माहिती लोकांनी घ्यावी आणि या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावे असे आवाहन श्री अंकुश चव्हाण यांनी केले. 

      कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी फाळणी वेदना स्मृती आणि भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील प्रत्येक घडामोडीवर लावणेत आलेल्या छायचित्रांचे अतिशय अभ्यासपूर्ण माहिती उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांना सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी दिली.

     पथनाट्यद्वारे रेल्वेच्या सांस्कृतिक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी १९४७ साली घडलेल्या फाळणीचे हुबेहूब सादरीकरण केल. हे वेदनादायी कहाणी बघून उपस्थितांची मने हेलावली. यावेळी मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत मातृभूमीच्या रक्षणाकरिता बलिदान आणि जीवन व्यतीत केलेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये १९७१ मधील युद्धऑपरेशन ब्ल्यू स्टार सारख्या अनेक सैनिकी कारवाई मध्ये सहभागी झालेले निवृत्त कर्नल एल एम साठेनिवृत्त सुभेदार मेजर नरेंद्र देवमाजी सैनिक अरुणकुमार तळीखेडेमाजी सैनिक कुटुंबीय आशा कवडे यांचा केंद्रीय संचार ब्यूरोकडून सन्मान करण्यात आला. रेल्वे स्टेशनवरील प्रदर्शन आजपासून 17 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे

 सदर प्रदर्शनामध्ये १९४७ वेळी झालेल्या फाळणीचे चित्र1757 ची प्लासीची लढाईसंन्यासी विद्रोहकित्तूर विद्रोह, 1857 लढ्यातील महान क्रांतिकारक राणी लक्ष्मीबाईझलकारी बाईमंगल पांडेतात्या टोपेनानासाहेब पेशवेबेगम हजरत महल यांचे छायाचित्र  मजकूरराजाराममोहन रॉयमहात्मा फुलेलोकमान्य टिळकरवींद्रनाथ टागोरडॉ अ‍ॅनी बेझंटपंडिता रमाबाईमॅडम भिकाजी कामाडॉ श्यामजी कृष्णा वर्मालाला हरदयाळअरविंद घोषलाला लजपतराय, दादाभाई नौरोजीफिरोजशाह मेहताचाफेकर बंधूसरदार वल्लभभाई पटेलमहात्मा गांधीपंडित नेहरूडॉ बाबासाहेब आंबेडकरवीर सावरकरखान अब्दुल गफार खाननेताजी सुभाषचंद्र बोसचंद्रशेखर आझादभगतसिंगअश्फाक उल्लासरोजिनी नायडूअरुणा असफलीउषा मेहता इत्यादी स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनाचंपारण सत्याग्रहखेडा सत्याग्रहअसहयोग आणि खिलाफत चळवळबार्डोली सत्याग्रहचौराचौरीकाकोरी काण्डचितगाव शस्त्रागारहिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनसविनय कायदेभंगदांडी यात्राचलेजाव आंदोलन, भारत-पाक फाळणीस्वातंत्र्यदिनसंस्थानचे विलीनीकरण आणि संविधान सभा आदी महत्वपूर्ण घटनांचे दुर्मिळ छायाचित्र आणि मजकूरांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. 

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास यादव यांनी केले आभार मचिंद्र गळवे यांनी मानले. महिषासुरमर्दिनी कला पथक तुळजापूर यांनी प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक श्री मीना, केंद्रीय संचार ब्युरोचे कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, रेल्वे स्टेशन मास्तर एस मीना, महावीर निमाणी, सी एन्थोनी, श्री कपिल, साईराज राउळ, योगीराज कोंडाबत्तीन, सुरज जाधव, किरण गवळी, रेल्वे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages