आजादी का अमृत महोत्सव: ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रमांतर्गत सायकल रॅली संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 15, 2023

आजादी का अमृत महोत्सव: ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रमांतर्गत सायकल रॅली संपन्न

 आजादी का अमृत महोत्सव: ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रमांतर्गत सायकल रॅली संपन्न

  पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने व पंढरपूर सायकल्स क्लब च्या वतीने आजादी का अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रांताधिकारी गजानन गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी या रॅलीस झेंडा दाखवून  सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, बाळासाहेब ठाकरे चौक, के बी पी कॉलेज, इंदिरा गांधी चौक, पंढरपूर अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी भव्य सायकल रॅली काढण्यात आली होती.

 या सायकल रॅलीस प्रांताधिकारी अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले,मुख्याधिकारी अरविंद माळी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर,माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे, सायकल्स क्लबचे महेश भोसले, रेखा चंद्रराव, सुरज अष्टेकर, आनंद शेटे, प्रशांत मोरे व इतर सायकल्स क्लबचे सदस्य व नगरपरिषद  नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रांताधिकारी गजानन गुरव, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.

 यावेळी नगर अभियंता नेताजी पवार, कर अधिकारी सुप्रिया शिंदे, कार्यालय अधीक्षक जांनबा कांबळे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, दर्शन वेळापुरे, चेतन चव्हाण, चिदानंद सर्वगोड, अनिल अभंगराव हे उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages