राष्ट्रवादीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय व तंत्रशिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं स्वागत
सोलापूर (कटूसत्य वृत):- पश्चिम महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय व तंत्र शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे सोमवारी सायंकाळी भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला शासकीय ध्वजारोहणानिमित्त सोलापुरात त्यांचं आगमन झालं यानिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड आणि इच्छा भगवंताच्या मित्र परिवाराच्या वतीने एम्प्लॉयमेंट चौक येथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विकास कामांच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात मंत्री हसन मुश्रीफ यांनी दबदबा कायम ठेवला आहे. दुर्गम वाड्या वस्त्यांत विकास कामं, अशा कामांमधून नामदार हसन मुश्रीफ यांनी जनमानसात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.दरम्यान अशा या नेत्याचं सोलापूर शहरात आगमनानिमित्त फुलांची मुक्त उधळण, फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशाच्या गजरात , हलगी, तुतारीच्या निनादात भला मोठा हार घालून,फेटा बांधून पेढे भरवून किसन जाधव,नागेश गायकवाड, चेतन गायकवाड इच्छा भगवंताची परिवारा यांच्यासह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती शेकडो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत राज्याचे वैद्यकीय व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं सोलापुरात जंगी स्वागत यावेळी करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून आपली राजकीय कारकीर्द घडवली धडाडीचा नेता अशी त्यांची जनसामान्यांमध्ये एक आदराचे स्थान आहे संघर्षातून आपले राजकीय अस्तित्व कसे टिकवायचे हे त्यांना ज्ञात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अत्यंत विश्वासू नेते हे मुश्रीफ आहेत, सोलापूरचे भावी पालकमंत्री अशा मंत्री महोदयांचं आज सोलापुरात आम्ही जंगी स्वागत केल्याचे यावेळी किसन जाधव यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेविका तसलीमा शेख यांचे पती इरफान शेख, समद सय्यद मिस्त्री,सचिन जाधव, नदी मडेवाल, सचिन सावंत, अमोल लकडे, सागर कांबळे शितल गायकवाड अमोल जगताप, संतोष गायकवाड, राजेश नेमाने, दत्ता वाघमारे, नागेश गायकवाड, कौसीन कुरेशी, अल्लाहबक्ष लालसाब सय्यद, उमेश जाधव, विनोद जाधव, खंडू जाधव, निलेश कांबळे, अरविंद निकम, वीरेश सुतार, किरण शिंदे, सोनू पटेल, दत्ता होसमनी, सचिन आगडेकर, फिरोज पठाण, शौकत बागवान, आदमान गिरडी, दयानंद जाधव, प्रेम गायकवाड,कार्तिक जाधव, निलेश काळे, विठू जाधव, अजय नरोडे,दिनेश चलवादी अल्ताफ पटेल, समीर शेख, नागराज गायकवाड प्रथमेश पवार, मुसिफ शेख इच्छा भगवंतांचे परिवार यांच्यासह राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment