श्री राजस्थानी विकास मंडळाच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 15, 2023

श्री राजस्थानी विकास मंडळाच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...!

 श्री राजस्थानी विकास मंडळाच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...! 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पाण्याचा एक थेंब नव्हे अंकुर झाडाला देऊ शकतो त्याप्रमाणे रक्ताचा एक थेंब एका माणसाचा जीव वाचवू शकतो. 

जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान रक्तदान श्रेष्ठ दान असल्यामुळे गेल्या २७ वर्षापासून सोलापुरातील बाळीवेस येथील श्री राजस्थानी विकास मंडळ रक्तदानाचा उपक्रम मोठ्या जिद्दीने पार पाडत आहे.

या मंडळाचे संस्थापक स्वर्गीय रामनिवास जी जाजू यांच्या विचारधारेनुसार या मंडळाचा कारभार आजही अतिशय पारदर्शकपणे होत असल्याचं मंडळाच्या विश्वस्तानी सांगितलं.

१९९७ पासून संस्थेचे संस्थापक स्वर्गीय श्री रामनिवास जी जाजू यांच्या पुढाकारातून आणि प्रेरणेतून २७ वर्षापासून प्रत्येक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे आज पर्यंत एकूण २३ हजार रक्त बाटल्याचा संकलन मंडळाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती राजस्थानी विकास मंडळाचे अध्यक्ष माणिकचंद डागा आणि सचिव कल्पेश मालू यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, श्री राजस्थानी विकास मंडळच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.

त्यामध्ये ओम सचिदानंद वाचनालय मोफत वृत्तपत्र वाचन, गीता प्रेस पुस्तकालय, कायमस्वरूपी पाणपोई, मारवाडी गुजर स्मशानभूमी देखरेख असल्याचे यावेळी विश्वस्त विजय जाजू यांनी सांगितलं.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी झेंडावंदन, महाशिवरात्री या उत्सवाच्या दिवशी शंकराच्या मूर्तीच्या अभिषेक, गरीब आणि गरजू लोकांना वैद्यकीय व शैक्षणिक मदत, विविध प्रशिक्षण, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन, समाजभूषण पुरस्कार, सामाजिक विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार आदी उपक्रम परवर्षी राजस्थानी विकास मंडळाच्या माध्यमातून आयोजित केले जात आहोत.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तदान श्रेष्ठ दान हीच धारणा मनात बाळगून मानवी जीवनात आपण कोणाच्यातरी जीव वाचवण्यात सहभागी झालं पाहिजे.

रक्तदान ही चळवळ झाली पाहिजे याची मानसिक समाधान बाळगत गेल्या २७ वर्षापासून सातत्याने १५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

यावर्षी सुद्धा ओम सचिदानंद वाचनालय कस्तुरबा मार्केटच्या माडीवर सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत रक्तदान शिबिरात आयोजन करण्यात आल आहे. 

दमानी ब्लड बँक आणि अश्विनी सहकारी ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला असून रक्तदात्यांनी उत्स्फूर्त पणे या चळवळीत सहभागी होणे काळाची गरज आहे.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नामवंत हृदयरोग तज्ञ डॉक्टर सत्यश्याम तोष्णीवाल यांच्या शुभहस्ते होणार आहे.

सध्या सोलापूर शहराला रक्त साठ्याची फार मोठी गरज असल्यामुळे शहरातील तरुणांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे आणि हा भव्य रक्तदान शिबिर यशस्वी करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष माणिकचंद डागा सचिव कल्पेश मालू यांनी केलआहे.

याप्रसंगी उपाध्यक्ष अशोक गौड, कोषाध्यक्ष रमेश बिहानी, सहसचिव सुहास लाहोटी, राजाराम उपाध्ये, धनराज मिनी यार, रामकिसन डागा, गोपाळ मंत्री, गोविंद प्रसाद लाहोटी, संतोष काबरा,  निलेश फोफलिया  नंदकिशोर भराडीया,  गिरीश जाखोटिया आधी सह इतर सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages