महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'सहाय्यक सरकारी अभियोक्ता (वर्ग-अ)' या पदी माढा येथील अँड.विशाल प्रकाश सक्री यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 18, 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'सहाय्यक सरकारी अभियोक्ता (वर्ग-अ)' या पदी माढा येथील अँड.विशाल प्रकाश सक्री यांची निवड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'सहाय्यक सरकारी अभियोक्ता (वर्ग-अ)' या पदी माढा येथील अँड.विशाल प्रकाश सक्री यांची निवड

 माढा (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'सहाय्यक सरकारी अभियोक्ता (वर्ग-अ)' या पदी माढा येथील अँड.विशाल प्रकाश सक्री यांची नुकतीच निवड झाली आहे.सरळ सेवा भरती पद्धतीने ही निवड झाली असून लेखी व मौखिक परीक्षेत ते यशस्वी झाल्याने त्यांची ही निवड झाली आहे.सध्या ते माढा येथील न्यायालयात विशेष सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत असून त्यांनी आजपर्यंत अनेक फौजदारी खटल्यात सरकार तर्फे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांचा नावलौकिक चांगला आहे.सुरुवातीच्या काळात त्यांनी खाजगी वकील म्हणून तर त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,बार्शी येथे विधी अधिकारी म्हणून काम केले आहे.या क्षेत्रात त्यांनी साधारण अठरा वर्षे काम केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल माढा परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages