सोलापूर शहरात अतिक्रमण विभागाची धडाकेबाज कामगिरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सध्या धडाकेबाज कामगिरी सुरू आहे. या अतिक्रमण मोहिमेमुळे रस्ते आणि चौक खुले होणार असल्यामुळे नागरिकांतून या मोहिमेचे स्वागत होत असताना काही राजकीय मंडळी मात्र अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना साहेबांचा फोन घ्या आणि मग अतिक्रमण काढा अशा प्रकारे बोलू लागल्यामुळे आणि नेत्यांचे फोन अतिक्रमण आता मोहिमेला ब्रेक लावण्यासाठीच असल्याचे बोलले जात आहे.
हा माझ्या गटाचा तो माझ्या गटाचा ही टपरी त्याची ती टपरी त्याची ही राहू द्या ती पाडा यातच सध्या अतिक्रमण विभागाला आपला वेळ वाया घालवून अतिक्रमण मोहीम पुढे पुढे रेटावे लागत असल्याचे दिसत आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment