नो- डिजिटल झोन...! शहरात पसरलंय वाढदिवसाचं लोणं...!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 26, 2023

नो- डिजिटल झोन...! शहरात पसरलंय वाढदिवसाचं लोणं...!!

 नो- डिजिटल झोन...!  शहरात पसरलंय  वाढदिवसाचं  लोणं...!! 


सोलापूर कटू सत्य (सचिन जाधव) : -सोलापूर शहरामध्ये आपल्या नावाची पाटी सर्वांना दिसावी.  यासाठी  सध्या प्रत्येक पक्ष ,संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. सोलापूर शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असतानाच शहरात मोठ्या प्रमाणात वाढदिवसाचे बॅनर झळकू लागल्यामुळे वाहनधारकांना दुसऱ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. 

त्याबरोबरच सोलापूर शहरात येणाऱ्या नेत्यांच्या स्वागताचे बॅनर, जयंती उत्सव आणि विविध जाती धर्मातील सणांसाठी मोठ्या प्रमाणात विनापरवाना डिजिटल बॅनर लावण्याची जणू सोलापूर शहरांमध्ये स्पर्धा लागलेली आहे.  डिजिटल बॅनर साठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा हाच पैसा जर सर्वसामान्य गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला तर शहरांमध्ये फार मोठी क्रांती होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सध्या ज्येष्ठ नागरिकांतून उमटून लागल्या आहेत. 

विनापरवाना डिजिटल फलक लावल्यास फौजदारी करू, असा आदेश महापालिका आयुक्तांनी काढले असली तरी सुद्धा निर्ढावलेला सोलापूरचा कार्यकर्ता या आदेशाला पायदूळ तोडून डिजिटल फलक लावण्यामध्ये क्रांती करू लागला आहे की काय..? 

छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाळीवेस,  टिळक चौक,   जोडभावी पेठ, भाजी मंडई ,जिल्हा परिषद, सात रस्ता,  विजापूर रोड,  सम्राट चौक  या भागात महापालिकेने डिजिटल लावण्यास मनाई केलेली असली तरी सुद्धा आम्हाला लागलय वाढदिवसाचं लोन.. असू द्या तुमचा नो डिजिटल झोन.. असंच हे कार्यकर्ते डिजिटल बॅनर लावून महापालिका प्रशासनाला दाखवून तर देत  नाहीत ना..? हे डिजिटल बॅनर लावल्यामुळे दोन दिवस लावणाऱ्यांना समाधान मिळत असले तरी सुद्धा रस्त्यावरील खड्ड्यामुळे स्मार्ट सिटी चे मात्र डिजिटल मुळे फार मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण होऊ लागल्याचे दिसत आहे. 

अधिकृत परवाना न घेता  मोठ्या प्रमाणात डिजिटल लावणारे वाढत आहेत. महापालिका प्रशासन मात्र हा सर्व प्रकार डोळे झाकून पहात आहे. महापालिकेने यासाठी एक मक्तेदार नेमला आहे तो कारवाई करत नसल्यामुळे तो नेमकं या लोकांकडून चिरमुरे खातो की काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. 

महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी कारवाई फक्त महापालिकेनेच का करावी असा प्रश्न उपस्थित करून या संदर्भात कानावर हात ठेवल्यामुळे सोलापूरकरांना स्वच्छ आणि सुंदर सोलापूर स्मार्ट सिटी कधी दिसणार ..?काही नुसत्या घोषणाच असणार...? महापालिकेने नेमलेल्या ठेकेदाराने कर्तव्यदक्ष राहून कोणत्याही गटाची पक्षाची किंवा संघटनेची गय न करता कठोर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय ही बॅनरबाजी आटोक्यात येणार नसल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages