शिंदे फडणवीस सरकार मध्ये तिसरा भिडू घुसल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या वर्षी सत्ता संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर अनेक आमदारांना नामदार होण्याची स्वप्न दाखवली होती परंतु वर्षभरापासून हा मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडत असताना अचानकपणे राष्ट्रवादीच्या काका पुतण्यास संघर्ष झाला आणि पुतण्याने सरकारमध्ये सहभागी होत मलाईदार खात सुद्धा मिळवलं.
"काना मागून आली आणि तिखट झाली" अशी एक मराठी म्हण आहे अगदी त्याप्रमाणेच अजित पवार लेट आले पण थेट आल्यामुळे मागच्या वर्षी शिवसेनेत फूट पाडून गेलेल्या शिंदे गटातील आमदारांना मात्र मंत्रीपदाच्या आशेवर पाणी सोडावं लागतं की काय अशी चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
गेल्या वर्षभरापासून अनेकांची नावे चर्चेत असताना सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा सुद्धा मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नंबर लागणार होता असा गोप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगोला दौऱ्यादरम्यान केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये तर्क वितरकांना उधाण आलेले दिसतंय.
सध्याच्या या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहभागी झाल्यामुळे शिंदे गटाची मात्र पंचायत झाल्याचे बोलले जात आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment