दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान बैठक संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-जिल्हयामध्ये दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्यादारी अभियानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद, सदस्य सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांच्या उपस्थितीत दिव्यांग विभागाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक संपन्न झाली.
या बैठकीस अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास महामंडळ , दिव्यांग विकास महामंडळ , ओबीसी महामंडळ , वसंतराव नाईक , भटक्या विमुक्ती महामंडळ, महानगरपालिका अलीम्कोचे अधिकारी , कौशल्य विकास विभागाच्या अधिकारी तसेच सर्व तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नगरपालिका, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी , सिव्हिल हॉस्पीटल व मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक आदी उपस्थित होते.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्यादारी हे अभियान यश्वस्वी करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे. दिव्यांग विभागामार्फत सर्व योजना आपण चांगल्या पध्दतीने राबवाव्यात एक हि दिव्यांग योजनेच्या लाभापासुन वंचित राणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ऑनलाईन बैठकीव्दारे दिल्या.
अभियानासाठी दिव्यांग कल्याण अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आमदार ओम प्रकाश देशमुख उर्फ बच्चू कडू तसेच दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव ,दिव्यांग कल्याण आयुक्त यांची उपस्थिती राहणार आहे. त्या अनुषंगाने सर्व अधिकाऱ्यांना अभियानाचे महत्व सदस्य सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी प्रस्ताविकात सांगितले.
तसेच या बैठकीस वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सचितानंद बांगर , कमलाकर तिकटे , रातचंद्र कुलकर्णी, सुरेश भोसले यांची उपस्थित होते.
No comments:
Post a Comment