रा. जि. प. प्राथमिक शाळा साई आदिवासी वाडी येथे आयआयबी क्लासेस लातूर तर्फे मोफत छत्री व शैक्षणिक साहित्याचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 16, 2023

रा. जि. प. प्राथमिक शाळा साई आदिवासी वाडी येथे आयआयबी क्लासेस लातूर तर्फे मोफत छत्री व शैक्षणिक साहित्याचे वाटप

 रा. जि. प. प्राथमिक शाळा साई आदिवासी वाडी येथे आयआयबी क्लासेस लातूर तर्फे मोफत छत्री व शैक्षणिक साहित्याचे वाटप

       बोरघर / माणगाव(कटूसत्य वृत्त):- दि.14/08/2023 रोजी साई आदिवासी वाडी येथील शाळेत मोफत दप्तर ,छत्र्या व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. धोंडू जाधव, उपाध्यक्ष श्री. गणेश पवार सर,सदस्य चंद्रकांत अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र साई चे आरोग्य अधिकारी डॉ. भालके सर, साई येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घुगे सर, लोकमान्य ज्ञानदीप विद्यालय साई चे सह शिक्षक सागर अधिकारी , नामदेव लाड,  साई आदिवासी वाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री नाचपले सर, सहशिक्षिका गाडगे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते.    
      शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर तसेच छत्र्या भेटल्यामुळे ग्रामस्थ व शिक्षकांनी देणगीदार श्री चिराग सिनेमा सर व आय वाय बी टीम लातूर यांचे आभार मानले. या शैक्षणिक साहित्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पाहायला मिळाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अशा दानशूर व्यक्तीमुळे देशप्रेमाची व एकोप्याची भावना वाढीस लागते असे उदगार उपाध्यक्ष श्री गणेश पवार सर यांनी काढले.. साई आदिवासी वाडी तील विध्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हेच ध्येय घेऊन आपण पुढे जाऊया अशा प्रकारची भावना मुख्याध्यापक नाचपल्ले सर यांनी आपल्या मनोगतात वेक्त केली.कार्यक्रमासाठी साई पंचक्रोशीतील विविध गावातील अध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिक,महिला ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages