संगणक परीचालक आत्महत्या प्रकरणातील दोषीवर तात्काळ गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करा
संगणक परिचालक संघटनेचे पंचायत समिती समोर निदर्शन,काळ्या फिती लावून अंदोलन
कुर्डुवाडी(कटुसत्य वृत्त):बिलोली तालुक्यातील हिप्परगाथडी ग्रामपंचायत येथील संगणक परिचालक अंबादास नागोराव पेटेकर यांनी सी एस सी- एस पी व्ही कंपनीने नाहक दिलेले टार्गेट, कामा व्यतिरिक्त लावण्यात येणारे इत्तर कामे,तसेच ग्रामपंचायत स्तरावर कामावरुन कमी करण्याच्या दिलेल्या धमक्या, राज्य शासन संगणक परिचालकांचा निर्णय घेण्यास करत असलेली टाळाटाळ या सर्व प्रकारामुळे होणारा मानसिक त्रास व दबावामुळे ९ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास हिप्परगाथडी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्या सर्व दोषीवर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावे या मागणी साठी परंडा तालुका संगणक परिचालक संघटना परंडा पंचायत समिती कार्यालयासमोर आणत १४ ऑगस्ट रोजी घोषणाबाजी करत करत काळ्या फिती लावून तालुक्यांतील संगणकपरिचालक यांनी निदर्शने केली
सुरवातीला अंबादास पेटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली
नाहक त्रास देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ताबडतोब अटक करा आणि मयत पेटेकर याला न्याय देण्यात यावा या आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, सहाय्यक गटविकास अधिकारी राऊत साहेब पोलिस सब इन्स्पेक्टर किरण घोंगडे, पोलिस नाईक एन पि गुंडाळे, पोलिस अमलदर बि एस आडसुळ यांना देण्यात आले.
या आंदोलनात संघटनेने जिल्हा सचिव आणि परंडा तालुका अध्यक्ष विश्वास गुडे, तालुका उपाध्यक्ष आरती काळे, संगिता कोळी, विनोद झिरपे, बालाजी दौंड, योगेश नरुटे, शौकत पठाण, गणेश चोपडे, विष्णु खांडेकर, शहाजी ठोंगे, राजकुमार गरड, उमेश जाधव, नाजीमा शेख, सुजाता पडदुने यांचेसह तालुक्यातील संगणक परिचालक उपस्थित होते
या प्रकरणातील सर्व दोषीवर लवकरच गुन्हे नोंद करून अटक करण्यात यावी अन्यथा संघटना पुढील दिवसामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल अशी माहिती जिल्हा सचिव विश्वास गुडे यांनी दिली.

No comments:
Post a Comment