Hot Posts

6/recent/ticker-posts

शासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार. - बी.आर.माळी प्रांताधिकारी

 शासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार.  - बी.आर.माळी प्रांताधिकारी


मंगळवेढा  (कटूसत्य वृत्त):- सांगोलाचे नूतन प्रांताधिकारी बी.आर.माळी यांचा सत्कार मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत साळे सर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मंगळवेढा व सांगोला ही तालुके दुष्काळी पट्ट्यातील तालुके म्हणून ओळखले जातात मंगळवेढ्याला मी 2008 साली तहसीलदार म्हणून काम केलेले असल्याने याचा फायदा मला प्रांताधिकारी म्हणून होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे  सर यांनी दुष्काळी भागातील लोकांच्या व्यथा मांडल्या शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही शेतीला पाणी नाही जनावरांना चारा नाही तसेच पावसाळ्यापूर्वी शिरनांदगी तलाव व आसपासच्या बंधाऱ्यावरील गाळ उचलण्याची परवानगी मिळावी  अशी विनंती त्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली प्रशांत साळे पुढे म्हणाले की पावसाळ्याचे अडीच महिने होऊनही  अद्याप तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे मंगळवेढा तालुक्यातील 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली आहे पण पिके पावसाअभावी  शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत कोमेजून जात आहेत तरी त्वरित शासनाने याची दखल घ्यावी तसेच चारा व पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील पशुधन वाचवण्यासाठी तालुक्यामध्ये चारा छावणी, चारा डेपो चालू करावेत अशी विनंती त्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली यावेळी उपस्थित अर्जुनराव तात्या पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सोलापूर, प्रकाश भोसले चेअरमन कविता अर्बन बँक सोलापूर,  पंढरपूर मंगळवेढा काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मारुती बापू वाकडे, ,भगवान माने ग्रामपंचायत सदस्य ,संतोष क्षिरसागर ,बी.टी पुजारी ,लालासाहेब भंडारे ,आकाश भोसले,पत्रकार मदार सय्यद,संदीप पवार प्रसिद्धीप्रमुख काँग्रेस मंगळवेढा आधी उपस्थित होते


Reactions

Post a Comment

0 Comments