हुन्नूर आश्रम शाळेत कृषी विभागाकडून जागतिक तृणधान्य वर्ष याबाबत मार्गदर्शन संपन्न
मंगळवेढा (कटूसत्य वृत):-मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे "जागतिक तृणधान्य वर्ष" अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागरूकता निर्माण करणे विषयी 1 ते 14 ऑगस्ट 2023 या कालावधीत तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना तृणधान्याचे महत्व पटवून देण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमोल बोरखडे कृषी पर्यवेक्षक नंदेश्वर यांनी राजगिरा या पिकाविषयी मार्गदर्शन केले. सुरेश ढाणे मंडळ कृषी अधिकारी नंदेश्वर यांनी तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्रीखंडे साहेब यांनी मार्गदर्शन करताना बदलत चाललेली जीवन पद्धती आणि त्यामुळे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम, आपल्याकडील उपलब्ध तृणधान्य जसे की बाजरी, ज्वारी, नाचणी, राळा, वरी यांचे पौष्टिक गुणधर्म व त्यापासून तयार होणारे निरनिराळे पदार्थ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी 'मिलेट ऑफ द मंथ' या संकल्पनेनुसार ऑगस्ट(श्रावण) महिना राजगिरा या पिकाकरिता असून याविषयी जनजागृती केली. संस्थेचे चेअरमन प्रशांत साळे यांनी शाळेत घेण्यात येणाऱ्या कृषी खात्याच्या कार्यक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यविषयी जागरूकता निर्माण करू याबाबत आश्वस्थ केले. सदर चालू असलेल्या कृषी विभागाच्या मोहिमेस शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन गावचे कृषी सहाय्यक धनाजी जाधव यांनी केले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गुरुदेव स्वामी व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी नंदेश्वर मंडळातील कृषी सहाय्यक तानाजी सावंत, दीपक कोकरे,अमित शिंदे,औदुंबर देवकाते, पांडुरंग चौधरी, राहुल इंगळे प्रयत्न केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मंडळ कृषी अधिकारी कार्यालय नंदेश्वर यांचे वतीने सर्व विद्यार्थ्यांना राजगिरा लाडूचे वाटप करणेत आले.

0 Comments