Hot Posts

6/recent/ticker-posts

होटगी( सावतखेड) ग्रुप ग्रामपंचायत मध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार...!

 होटगी( सावतखेड)  ग्रुप ग्रामपंचायत मध्ये  करोडो रुपयाचा भ्रष्टाचार...! 

शिवसेना  तालुका समन्वयक गंगाराम चौगुले  भ्रष्टाचाराच्या विरोधात

 उतरले रस्त्यावर...!! 


सोलापूर (कटू सत्य वृत्त) : - भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी सरकारने अनेक योजना ऑनलाइन केल्या तरी सुद्धा भ्रष्टाचाराचे झाड जोमाने वाढू लागलंय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी (सावतखेड) ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सत्ताधारी पॅनल प्रमुख, ग्रामसेवक, सरपंच,  उपसरपंच  आणि ग्रामपंचायत सदस्य या चांडाळ चौकडीने संगणमताने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्यामुळे ही ग्रामपंचायत बरखास्त करून तात्काळ प्रशासक नेमावा,  आणि  भ्रष्ट ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करून  निलंबित करावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दक्षिण सोलापूर तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका समन्वयक गंगाराम चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे समन्वयक गंगाराम चौगुले पुढे बोलताना म्हणाले की, " मौजे होटगी सावत खेड  ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सर्वांनी मिळून संगणमताने करोडोचा भ्रष्टाचार केलेला आहे. होटगी गावातील जिल्हा परिषद शाळेचे सुरक्षा भिंत मंजूर करण्यात आली होती. परंतु शाळेची संरक्षण भिंत न बांधता दिनांक 14 /4 /2022 रोजी 284050 /- रुपये ( दोन लाख 84 हजार पन्नास रुपये) परस्पर  15 व्या वित्त आयोगातून हडप केल्याने ग्रामपंचायतीचा विकास थंडावला आहे. 

त्यानंतर मार्च 2018 ते मार्च 2023 यादरम्यान माहितीच्या अधिकाराखाली आम्ही माहिती मागितले असता, असे निदर्शनास आले आहे की, वासवदत्ता सिमेंट कंपनीकडून पाच वर्षात एकदाच सन 2021 ते 2022 या वर्षाचे व्यावसाय कर 3553907/- रुपये( 35 लाख 53 हजार 907 रुपये) भरल्याचे कागदोपत्री दिसत असून चार वर्षाचे वासवदत्ता सिमेंट कंपनीचे अंदाजे 14215628/- रुपये

( एक कोटी 42 लाख 15 हजार 628 रुपये) या सर्व मंडळींनी" सब माल अपना" याप्रमाणे खाबुगिरी करत हडप केला आहे. या सर्वांनी मिळून करोडो रुपयाचा चुना ग्रामपंचायतला लावल्यामुळे गावाच्या विकास प्रक्रियेला ब्रेक लागला असल्या मुळेच आपण रस्त्यावर उतरलो असल्याचं चौगुले यांनी सांगितलं. 

याशिवाय होटगी सावतखेड ग्रुप ग्रामपंचायतला  सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, चार पेट्रोल पंप, चार मोठ्या फॅक्टरी, वीट भट्टी यापासून मोठ्या प्रमाणात व्यावसाय कर मिळतो. परंतु यामध्येही मोठा  भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे तर शासनाने तयार केलेल्या ई ग्राम स्वराज्य  या ऑनलाइन प्रणाली द्वारे ग्रामपंचायतीमध्ये होणारा खर्च जमा ही सर्व माहिती सामान्य नागरिकांसाठी ग्रामपंचायत मध्ये प्रसिद्ध केली पाहिजे.  असा शासनाचा नियम आहे. परंतु या ई प्रणालीचा या ग्रामपंचायतीने सज्जा उडवला असून शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवल्याचं दिसत आहे. 

भ्रष्टाचार लपवण्यासाठी ग्रामनिधी ची माहिती सुद्धा सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक लपवीत असून सर्व माहिती प्रसिद्ध न करता अर्धवट माहिती प्रसिद्ध करण्यात येत असल्याचं दिसून येत असून हा भ्रष्टाचार लपवण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा हात असल्याचं दिसत आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे आणि पॅनल प्रमुख  रामप्पा चिवड शेट्टी  आणि ग्रामसेवक बी डी पाटील तसेच सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी संघनमताने करोडचा भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झालंय. 

तरी या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावे .अशी मागणी यावेळी गंगाराम चौगुले यांनी केली आहे. 

या पत्रकार परिषदेला शिवाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत चौगुले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख योगीराज पाटील, विभाग प्रमुख योगीराज चिवडशेट्टी, पंडित गंगदे आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments