Hot Posts

6/recent/ticker-posts

ऋतुजा जोध व हर्षवर्धन जोध महसूल विभागाच्या जिल्हा शिष्यवृत्तीचे मानकरी

 ऋतुजा जोध व हर्षवर्धन जोध महसूल विभागाच्या जिल्हा शिष्यवृत्तीचे मानकरी


मंगळवेढा (कटूसत्य वृत):- सोलापूर येथे ७ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाच्या सांगता समारंभाच्या शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने रंगमवन सोलापूर येथे महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना इयत्ता नववी व अकरावी मध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले .
      यामध्ये भोसे महसूल मंडलाधिकारी एन.डी.जोध यांची दोन्ही मुले हर्षवर्धन व ऋतुजा हे दोघेही मानकरी ठरले असून या दोघांचाही सत्कार जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या हस्ते करण्यात आला.
     याप्रसंगी माजी जिल्हाधिकारी जगदीश पाटील, तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, अव्वल कारकून, महसूल सहायक,  शिपाई कोतवाल, पोलीस पाटील उपस्थित होते.सख्खे बहीण भाऊ या शिष्यवृत्तीचे मानकरी ठरल्याबद्दल त्यांचे आमदार समाधान आवताडे, उपविभागीय अधिकारी बी,आर,माळी तहसीलदार मदन जाधव व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments