पापय्या तालीम संघात 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 17, 2023

पापय्या तालीम संघात 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..!

 पापय्या तालीम संघात 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराच्या वैभवा मध्ये गेल्या अनेक वर्षापासून  योगदान देणारी आणि शहर जिल्ह्यामध्ये सर्वात जुनी तालीम म्हणून ज्या तालमीचा उल्लेख केला जातो ती तालीम म्हणजे पापय्या तालीम....!
या ठिकाणी शहर जिल्ह्यातील अनेक मल्लांना कुस्तीचे आणि व्यायामाचे धडे दिले जातातच. या शिवाय या तरुणांना देशप्रेम आणि समाजसेवा याचीही शिकवण देण्याचा प्रयत्न अध्यक्ष जगन्नाथ व्यवहारे यांच्या माध्यमातून केला जातो. त्याच धर्तीवर पापय्या  तालीम संघाच्या वतीने जुनी मिल कंपाऊंड येथील ऐतिहासिक पापय्या तालीम प्रांगणामध्ये देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साही आणि भव्य आणि दिव्य वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष तथा प्रसिद्ध कीर्तनकार सुधाकर पंत इंगळे महाराज यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विठ्ठलाच्या भक्तीतून देशभक्ती चा धडा देणारे इंगळे महाराज यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. कीर्तनकार पंकज गुंड, तालीम संघाचे अध्यक्ष जगन्नाथ व्यवहारे, उपाध्यक्ष जयंत मोरे, सेक्रेटरी प्रदीप शिर्के, खजिनदार गणेश कुलकर्णी, सदस्य प्रकाश सुरवसे ,बंडू कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण समारंभ उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला.या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहासाठी पांडुरंग पवार, शिवाजी चटके, लक्ष्मण भगत,  किरण बायस, विजय पाटील,  अजित शिंदे,  प्रकाश  पवार, तानाजी सावंत,  सागर पाटकर, विकेश गायकवाड, अनिल इंगळे,  मल्लिनाथ गुरव,  संभाजी मळगे,  रणजीत खताळ,  प्रवीण सुरवसे,  प्रथम पडवळकर ,कन्हैया मुक्ता,  ओंकार कोडगळे, ऋषिकेश चव्हाण,  अमोल जाधव,  श्रीनिवास  कोटा,  गणपत माने,  विष्णुपंत जाधव,  बबन झिंगाडे,प्रेम इंगळे,  तुकाराम राऊत  आधीसह सभासद ,व्यायामपटू ,कुस्तीपटू क्रीडाप्रेमी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लहान बालकांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन वसंत कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंत मोरे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages