राज्यस्तरीय संस्कार परीक्षा..! गांधी रिसर्च फाउंडेशन चा उपक्रम...!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठीच गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव या संस्थेतर्फे गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेचा आयोजन करण्यात आल्याची माहिती या संस्थेचे समन्वयक तथा गांधी विचार संस्कार परीक्षा मार्गदर्शक उदय महाजन दिली यांनी दिली.
यावेळी बोलताना महाजन पुढे म्हणाले की, संस्थेच्या गांधी विचार संस्कार परीक्षेत सहभागी होणाऱ्या शाळांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून गांधीजींनी कायम व्यक्तिगत पातळीवर स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले आहे. स्वावलंबन व स्वच्छता या मूल्याची सवयी विद्यार्थी दशेतच अंगीकारले पाहिजे याच विचारधारेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आला आहे. अ हिंसक समाज निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या महात्मा गांधीजींचा विचार जास्तीत जास्त तळागाळातल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावेत याच उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव या संस्थे मार्फत गांधी विचार संस्कार परीक्षा 2017 पासून घेण्यात येत आहे. या परीक्षेचे हे 17 वे वर्ष असून आजपर्यंत 22 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिल्याचं महाजन यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, इयत्ता पाचवी ते पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच शिक्षक ही ही परीक्षा देऊ शकतात. मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी या भाषातून ही परीक्षा घेतली जाते. यात परीक्षार्थींना एक पुस्तक वाचण्यासाठी दिले जाते. आणि त्यावर आधारित परीक्षा घेण्यात येते. प्रत्येक इयत्तेतील जिल्हास्तरीय प्रथम तीन विद्यार्थ्यांना पदके व सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित केले जाते. विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या माध्यमातून ही परीक्षा देता येते. शाळा व विद्यार्थ्यांच्या सहभाग दिवसेंदिवस या परीक्षेसाठी वाढत आहे असेही समन्वयक गिरीश कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. गांधी विचार संस्कार परीक्षा समन्वयक गिरीश कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले की, च्या शाळा गांधी विचार संस्कार परीक्षेसाठी सहभाग घेऊ इच्छिता त्या शाळा गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेत सहभागी होऊ शकतात. यात शाळांना शाळा स्तरावर स्वच्छता समिती गठित करावी लागेल. तसेच प्रत्येक वर्गाची ही स्वच्छता समिती असेल. शाळांनी आपली शाळा व परिसर निमितपणे स्वच्छ ठेवण्याची रचना निर्माण करणे अपेक्षित आहे. विद्यार्थी पालक आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रबोधन करणारे तसेच त्यांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. ऑगस्ट पासून पूर्ण शैक्षणिक वर्षात या सर्व शाळांचं परीक्षण करण्यात येणार असून राज्यातील 50 स्वच्छ शाळांची मानांकन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
प्रथम क्रमांकाच्या शाळेला एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार असून ग्रामीण शहरी व महानगरातील प्रथम तीन शाळांना अनुक्रमे 31000 रुपये 21000 रुपये आणि 11000 रुपयांची रोख पारितोषिके सुद्धा देण्यात येणार आहेत.
आपल्या जिल्ह्यातील ज्या शाळा महाविद्यालयांना गांधी विचार संस्कार परीक्षेत व प्रतियोगितेत सहभागी व्हायचं असेल त्यांनी सोलापूर जिल्हा समन्वयक तथा गांधी विचार संस्कार परीक्षा समन्वयक दिनानाथ अनंत रत्नपारखी
(मो. नं.--9075520083) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने करण्यात आल आहे.

No comments:
Post a Comment