सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने हेमंत चौगुले यांचा विशेष सन्मान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासना तर्फे सोलापुर जिल्हाअधिकारी यांच्यामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारताच्या स्वातंत्र्य लढयात व हैद्राबाद मुक्ती संग्राम लढयात महान कार्य केले आहे असे भारत देश स्वातंत्र्यासाठी थोर देश भक्त स्वातंत्र सेनानी कै. कृष्णाजी गणपत चौगुले रा. नान्नज ता. उत्तर सोलापूर यांना गुलबर्ग्या जवळील असलेल्या चितापुरच्या तत्कालीन कोर्टाने ६ महिने सश्रम कारावासाच्या शिक्षेचा आदेश झाला होता त्यानुसार त्यांना चितापुर जेलमध्ये ६ महिने ठेवण्यात आले होते तेथुन उस्मानाबाद जेलमध्ये ६ महिन्यांची सश्रम कारावास भोगला प्रत्यक्ष १ वर्षाचा तुरुंगवास भोगला होता व ब्रिटीश सरकाराचे कोर्टाचे व हैद्राबाद निजाम सरकारचे पोलिसांचीही वॉरंट त्यांना होते देश स्वातंत्र्यासाठी कै. कृष्णाजी गणपत चौगुले यांनी प्रत्यक्ष व भुमीगत राहुन महान कार्य केले आहे. कै. कृष्णाजी गणपत चौगुले यांचा मृत्यृ ०६/०९/२०१० ला झाला. यांच्या धर्म पत्नी श्रीमती रूक्मीणी कृष्णाजी चौगुले यांचे पतीच्या बरोबरीने देश स्वातंत्र्याच्या कार्यायात त्यानी ही महान कार्य केले आहे तेही स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांना दोन मुले हेमंत चौगुले, महेश चौगुले, दोन मुली शैलजा चौगुले, विमल चौगुले तसेच रूक्मीणी चौगुले यांना दोन सुना व नांतवडे आहेत हेमंत चौगुले यांचे तीन मुले व महेश चौगुले यांचे दोन मुले व एक मुलगी आहे असा स्वातंत्र्य सैनिक कुटुंबाचा परिवार आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढयात व हैद्राबाद मुक्ती संग्राम लढयात दिलेल्या योगदान महान कार्याच्या प्रित्यर्थ उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नजचे स्वातंत्र्य सैनिक कै. कृष्णाजी गणपत चौगुले यांचा (मुलगा) हेमंत कृष्णाजी चौगुले यांचा कुटुंबाचा सत्कार उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. १ सदाशिव पडदुणे व उत्तर सोलापूर चे तहसिलदार मा. सैफन नदाफ साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ' महाराष्ट्र शासनाचे 'सोलापुर जिल्हाअधिकारी कार्यालामार्फत "मानपत्र, देण्यात आले स्वातंत्र्याच्या ७५ वे अमृत महोत्सवाची "ट्रापी "देण्यात आली . त्याप्रसंगी योगेश हेमंत चौगुले, श्रीनिवास हेमंत चौगुले अनिरूध्द हेमंत चौगुले उपस्थित होते. याकार्यक्रमाचे प्रमुख दक्षिण सोलापुर चे आमदार सुभाष देशमुख व इतर मान्यवर व स्वातंत्र्य सैनिक , महसुल अधिकारी मोठया संख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम बहुउद्देशीय सभागृह जिल्हाअधिकारी कार्यालय सोलापुर येथे मोठया उत्सवात आनंदात संपन्न झाला.
.png)
No comments:
Post a Comment