माढा लोकसभा मतदार संघ आम्ही लढवणार - हुसेन दलवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 17, 2023

माढा लोकसभा मतदार संघ आम्ही लढवणार - हुसेन दलवाई

 माढा लोकसभा मतदार संघ आम्ही लढवणार - हुसेन दलवाई



अकलूज (कटूसत्य वृत्त):- 43 माढा लोकसभा मतदार संघ काँग्रेस लढवणार आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून आणणार असे ठाम मत माढा लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक माजी खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.
      काँग्रेसच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकलूज येथील श्रीराम मंदिरात प्रत्येक तालुक्यातील मतदारांकडून पक्षाची सध्य स्थिती,संभाव्य उमेदवार, व रणनीती या संदर्भात चाचपणी करण्यात आली.त्यासाठी माढा मतदार संघाचे निरीक्षक माजी खासदार हुसेन दलवाई व प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी हे आले होते.यावेळी माजी आमदार धनाजी साठे,पालघर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रफिक भोरी,प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील,दादा साठे, माणा तालुक्याचे काँग्रेस नेते रणजित देशमुख,काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष सूनंजय पवार,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील,जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व राज्य कार्यकारिणी तसेच जिल्हा पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी या मतदासंघातील काँग्रेस विचारसरणीचा इतिहास सांगताना हा पूर्ण मतदार संघ काँग्रेसचा असून स्व.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी सन २००९ मध्ये या मतदारसंघातून स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी निश्चित केली होती मात्र पुढे ती शरद पवारांना देण्यात आल्याचे सांगितले.या मतदार संघातील नेते कुठेही असेल तरी जनता काँग्रेससोबत असल्याचे सांगितले.
   यावेळी मोहन जोशी म्हणाले की,डॉ धवलसिंह यांच्या आगमनाने सोलापूर जिल्हा काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे.त्यांनी प्रत्येक तालुक्यात नव्हे तर अगदी गावागावात जाऊन काँग्रेस वाढवली आहे.सर्वसामान्य कार्यकर्ता हीच काँग्रेसची मोठी ताकद आहे. व त्याच जोरावर हिमाचल प्रदेश,कर्नाटक मध्ये परिवर्तन झाले असून लवकरच येणाऱ्या राजस्थान,मध्य प्रदेश, छत्तीसगड मध्येही नक्की परिवर्तन होणार आहे.राज्यात जातीयवादी सरकार टाळण्यासाठी महविकास आघाडी होणार असून त्यात राज्यात काँग्रेस नंबर एक होणार आहे.निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना काँग्रेस निश्चित ताकद देणार आहे.त्यामुळे आज नव्हे आतापासून कामाला लागूया असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निरीक्षक दलवाई म्हणाले की,देशभरात भाजपच्या खोट्या वागण्याने व खा.राहुल गांधी यांच्या देशभरातील भारत जोडो यात्रेने वातावरण बदलले असून आपली ताकद वाढली आहे.हा पुरोगामी विचारांचा मतदार संघ असून तो पूर्वीपासून काँग्रेस विचार सरणीचाच आहे,त्यामुळे हा मतदार संघ मिळवण्यासाठी आम्ही आग्रही राहणार असल्याचे दलवाई म्हणाले.
चौकट
प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रोहन सूरवसे पाटील म्हणाले, माढा लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. भाजपच्या भ्रष्टचारी कारभाराला देशातील जनता कंटाळली आहे.गल्ली पासून दिल्ली पर्यंत मोदी शाह आणि भाजप विरोधी मतप्रवाह तयार झाले आहे.माढा लोकसभा मतदार संघातील चित्र देखील  पूर्णपणे विद्यमान खासदार आणि भाजप विरोधात आहे.येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे युवक काँग्रेस पदाधिकारी ताकत लावणार आहे.या मतदार संघात आमचा विजय निश्चित असल्याचे प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सूरवसे पाटील म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages