मराठा सेवा संघाची माळशिरस तालुका कार्यकारिणी जाहीर
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुका मराठा सेवा संघाची तालुका कार्यकारिणी शनिवार दि 12 ऑगस्ट रोजी अकलूज येथे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निनाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली यावेळी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य उत्तमराव माने उपस्थित होते
मराठा सेवा संघाच्या तालुका शाखेच्या मार्गदर्शक म्हणून अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील ,अशोकराव रणनवरे, आर एस रणनवरे यांची एकमताने निवड करण्यात आली तर तालुका कार्याध्यक्षपदी डॉ. अमोल उत्तमराव माने अकलूज, सचिव पदी राजेंद्र वसंतराव मिसाळ वाघोली, उपाध्यक्षपदी सुदर्शन दादासो हंबीरे विठ्ठलवाडी ,सुधाकर भानुदास मुंगूसकर वेळापूर ,प्रा. विनोद विष्णू बाबर पाणीव, नीता अंकुश गोडसे अकलूज, खजिनदार पदी नवनाथ शिवाजीराव नागणे अकलूज, संघटक भारत युवराज सांगडे ,अशोकराव अगतराव पवार वेळापूर, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून शिवाजीराव तुकाराम लोंढे माळेवाडी ,जयकुमार तुकाराम केचे लवंग, राजेंद्र महादेव जाधव नेवरे, अण्णासाहेब गोरख मगर निमगाव ,जगन्नाथ प्रभाकर रणनवरे फोंडशिरस, विजय दुर्योधन मोहिते विठ्ठलवाडी निवड करण्यात आली
प्रसिद्धी प्रमुख म्हणून पिलीव, झिंजेवस्ती येथील उदय श्रीमंत कदम तर अकलूज शहराध्यक्ष म्हणून नितीन काकडे यांना निवडीचे पत्र तालुकाध्यक्ष निनाद पाटील व उत्तमराव माने यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ पार पडला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व जिजाऊ वंदनेने केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नूतन सचिव राजेंद्र मिसाळ यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष निनाद पाटील यांनी मानले .
.png)
No comments:
Post a Comment