विद्यार्थ्यांनी कायम स्वयमं चिंतन करावे - प्रा.रोहित देशमुख "शिवरत्न पॅटर्नच्या वतीने मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन" - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 17, 2023

विद्यार्थ्यांनी कायम स्वयमं चिंतन करावे - प्रा.रोहित देशमुख "शिवरत्न पॅटर्नच्या वतीने मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन"

 विद्यार्थ्यांनी कायम स्वयमं चिंतन करावे - प्रा.रोहित देशमुख "शिवरत्न पॅटर्नच्या वतीने मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन"

अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न शिक्षण संचलित, शिवरत्न पॅटर्न अकलूजच्या विद्यार्थ्यांच्या करीता अभ्यासाच्या बरोबरच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित व सक्षम करण्यावर भर देण्याच्या उद्देशाने संस्थेच्या अध्यक्ष शितलदेवी मोहिते पाटील , धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनपर व संचालक डाॅ.विश्वनाथ आवड यांच्या सूचनेनुसार प्रा. रोहित रमेश देशमुख यांचे उद्याच्या उज्वल भविष्यासाठी."  या विषयावर ११ वी १२ वीच्या विद्यार्थ्यांकरीता  सेमिनारचे आयोजन शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज येथे करण्यात आले होते प्रा. रोहित रमेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यानी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सातत्य आणून जीवनामध्ये यश कसे संपादन करायचे या बाबत मार्गदर्शन केले, अभ्यास करताना एकाग्रता कशी वाढवायची , कोणतीही गोष्ट करत असताना स्वयम चिंतन आणि एकाग्रता ही किती महत्त्वाचे आहे ते सांगितले. तसेच भविष्यामध्ये येणारे अडचणी वर मात कसे करावे व त्या अडचणींना मात करण्यासाठी आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सातत्य आणि चिकाटी कशा पद्धतीने आणावी अशा इत्यादी गोष्टी सविस्तर सांगितले. सदरच्या मार्गदर्शन सेमिनारसाठी, संस्थेच्या अध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य अल्बर्ट थरकन,बिनो के पाऊल्स, शिवरत्न पॅटर्न समन्वयक प्रा. राजकिरण माने व सर्व एनसीईआरटी व स्टेट बोर्डचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवरत्न पॅटर्नचा विद्यार्थी कु. कुसुम डांगे हीने केले. पाहुण्यांचा परिचय कु. अभिनव ठोंबरे याने दिला व आभार कु. सुचित्रा शिंदे हिने मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages