महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघ यांच्या संयुक्त विद्यामाने प्रशिक्षण वर्ग व परिसंवाद तालुकास्तरीय कार्यक्रम आयोजित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 19, 2022

महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघ यांच्या संयुक्त विद्यामाने प्रशिक्षण वर्ग व परिसंवाद तालुकास्तरीय कार्यक्रम आयोजित

 महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघ यांच्या संयुक्त विद्यामाने प्रशिक्षण वर्ग व परिसंवाद तालुकास्तरीय  कार्यक्रम आयोजित

माढा (कटूसत्य वृत्त):- सोलापूर सह महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारापासून व दलालापासून आर्थिक शोषण थांबवण्यासाठी व केळी उत्पादक शेतकर्यांना निर्यात केळी पिकवण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघ यांच्या संयुक्त विद्यामाने प्रशिक्षण वर्ग व परिसंवाद तालुकास्तरीय  कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी  जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातुन   केळी   संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी केली आहे.
किरण चव्हाण यांनी विजयसिंह गायकवाड,तज्ञ संचालक कुबेर रेडे,तज्ञ  संचालक हनुमंत चिकणे,ऊस संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील  या  शिष्टमंडळासमवेत  कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांची भेट घेऊन केळी उत्पादक शेतकर्याची  व्यथा मांडली.तसेच तालुकास्तरीय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा) तसेच जिल्हा कृषी सल्ला समितीमध्ये केळी  संघाच्या एका प्रतिनिधीची नेमणूक होण्याची  मागणी देखील   निवेदनात किरण चव्हाण यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages