सुवर्ण पदक विजेती अनुष्का कुंभार हिचे चिंतामणी नगरीत स्वागत

थेऊर (प्रविण शेंडगे):- कुवेत येथे झालेल्या आशियाई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 4 × 300 मीटर रिले स्पर्धेत गोल्ड मेडल तर 300 मीटर मध्ये कांस्य मेडल महाराष्ट्राची सुवर्ण कन्या कुमारी अनुष्का दत्तात्रय कुंभार हिला मिळाले, तसेच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियन कुमारी सृष्टी विजय जाधव आंतरराष्ट्रीय चॅम्पियन कुमारी साक्षी सरोदे यांचे आज स्पर्धा पूर्ण करून सकाळी अकरा वाजता लोहगाव येथील विमानतळावर आगमन झाले, तेथून त्यांचे श्री क्षेत्र थेऊर चिंतामणी नगरीमध्ये आगमन झाले. थेऊर येथील पोलीस चौकी येथे फटाक्यांच्या आतेषबाजीने तसेच हार ,शाल , देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले .
चिंतामणी विद्या मंदिर ते चिंतामणी मंदिरा पर्यंत हलगी, तुतारी , ढोल , ताशा , अश्या पारंपारीक वाद्याच्या गजरात वाजत,गाजत, मिरवणुक काढण्यात आली . चिंतामणी मंदिरात गेल्यानंतर या विजयी जिजाऊ सावित्रीच्या लेकींच्या शुभ हस्ते चिंतामणी चीं आरती करण्यात आली .
त्यानंतर त्यांचा चिंतामणी विद्या मंदिर थेऊर मध्ये शाल, श्रीफळ व फेटा घालून सन्मान करण्यात आला. उपस्थितांनच्या वतीने शुभेच्छा, सदिच्छा, आणि आशीर्वाद देण्यात आले. यावेळी थेऊर पोलीस चौकीचे पीएसआय देशमुख ,सत्कारमूर्ती सृष्टीचे वडील पो. ह. विजय जाधव, स्मिता जाधव, पो. नाईक महावीर कुंटे, पो. नाईक विशाल बनकर, पो. नाईक दिगंबर जगताप, अनुष्काचे वडील व वरणे ( सातारा) गावचे सरपंच पै.दत्तात्रय कुंभार कुटुंबीय तसेच चिंतामणी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नेवाळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर खरात, संजय कांचन,हनुमंत लोंढे, वाघमारे, मारुती कांबळे , ग्रा.पं. सदस्या कुमारी गौतमी कांबळे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सिताराम लांडगे, पत्रकार बापूसाहेब धुमाळ,पुजारी,पोलीस मित्र संतोष गायकवाड, राहुल गायकवाड, भगवानराव शेडगे, थेऊर येथील ग्रामस्थ, याप्रसंगी उपस्थित होते
No comments:
Post a Comment