एक अंकी व्याजदराने 35 लाख रूपये कर्जमर्यादा करणार- मोरे

कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त) :- गत पंचवार्षिकला दिलेली सर्व आश्वासने पुर्ण केली असून आगामी कालावधीत सभासदांना एक अंकी व्याजदराने ३५ लाख रूपयापर्यंत कर्जमर्यादा वाढविणार असून गुरूसेवा पॕनेलच्या सर्व १९ उमेदवारांना विमान चिन्हावर शिक्का मारून विक्रमी मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन पॕनलचे नेते म.ज.मोरे यांनी केले.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूकीच्या निमित्ताने कुर्डूवाडी येथे अयोध्याश्री मंगल कार्यालयात गुरूसेवा पॕनेल आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी गुरूसेवा पॕनेलने वचननामा प्रसिद्ध केला.त्यानुसार नियमित कर्जफेड करणाऱ्यांना १% व्याजदर सवलत,सभासदांना कॕशलेस वैद्यकीय सेवा पुरविणार, सभासदांच्या आकस्मिक मृत्यूनंतर वारसांना २० लाख मदतनिधी देणार, नैमित्तिक कर्जमर्यादा वाढवून शैक्षणिक कर्जमर्यादा ३लाख तर प्रापंचिक कर्जमर्यादा १लाख करणार,सभासदांच्या पाल्यांसाठी सोलापूरात वस्तीगृह बांधणार, शाखानिहाय व्यापारी गाळे बांधून प्राधान्याने सभासदांच्या पाल्यास देणार व संस्थेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणार अशी अनेक आश्वासने वचननाम्यातून जाहीर केली.
यावेळी व्यासपिठावर गुरूसेवाचे सर्व उमेदवार,रमेश शिंदे,बाळासाहेब काळे,शिवानंद भरले,अंकुश काळे, बाळासाहेब काशिद,महादेव जठार, ज्ञानेश्वर चट्टे,मुकुंद तांबीले,संतोष जाधव,चंदाराणी आतकर,अंबुताई ईतापे उपस्थित होत्या.सुत्रसंचालन किशोरकुमार आडकर यांनी तर आभार आबासाहेब उबाळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊराव शिंदे, प्रवीण नागटिळक, मनोज पवार,संजय काशिद,संतोष वरकुटे,पांडुरंग ढेरे,सुनील शिंदे, वामन हांडे,किरणकुमार पंडीत, बाळासाहेब बोडके,बाबासाहेब चव्हाण,सिमिंता कुंभार,अंजली पवार,राजश्री कुबेर,चंद्रकला नागणे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment