Hot Posts

6/recent/ticker-posts

शहरात 'भेसळयुक्त खवा' विक्रेत्यांचा हैदोस..!

 शहरात 'भेसळयुक्त खवा' विक्रेत्यांचा हैदोस..!   

  

                                                            

अधिकारी म्हणतात आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्या. 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर व जिल्ह्यात 'गोड खवा' या नावाखाली 'भेसळयुक्त खवा' विक्रेत्यांनी हैदोस मांडलेला आहे. आशा मिठाई विक्रेत्यांवर व भेसळयुक्त खावा विक्रेत्यावर कारवाई करण्याऐवजी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रदीप राऊत म्हणतात, सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी स्वतःच घ्यावी.


खव्यात भेसळ.. 

1) 'गोड खवा' टाल्कम पावडर (तोंडाला लावण्याची पावडर), मुदत संपलेली किंवा खराब दुधापासून बनवलेली दुध पावडर, रवा, डालडा व अन्य घटकांचे मिश्रण करून 'गोड खावा' बनविला जात असल्याचे काहींनी सांगितले.

2) पेढा हा पदार्थ फक्त दुध आणि साखरेचे मिश्रण करूनच बनविला जातो. परंतू सरास मिठाईच्या दुकानात एक तर 'गोड खावा' या पासून किंवा डालड्यापासून बनविलेला पेढा विक्रीस असतो.

3) सर्व मिठाई दुकानदारांनी प्रत्येक पदार्थात कोणकोणते घटक वापरुन तो पदार्थात बनविला आहे. याचा फलक त्या पदार्था जवळ ठेवणे बंधनकारक आहे. परंतू सरास मिठाई दुकानदार अशा पध्दतीचा फलक ठेवत नाहीत किंवा तो पदार्थ कोणकोणते घटक वापरुन बनविला आहे. याची माहीती ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. परंतू तसी माहिती मिठाई दुकानदार ग्राहकास देत नाहीत. 

4) ठळक मुद्दे खव्यात प्रामुख्यानं रताळी, शिंघाडा पीठ, वनस्पती तूप, स्टार्च यांची भेसळ केली जाते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिवाळी अगदी दोन व तीनच दिवसावर येऊन ठेपलेली आहे. सध्या गुजरात, गुलबर्गा व बीड परिसरातून भेसळयुक्त खवा, गोड खव्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात येत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सरास मिठाई दुकानदार तो भेसळयुक्तच खवा वापरत असल्याचा आरोप टिळक चौकातील खवा विक्रेते करीत आहेत. याबाबत अन्न व औषध प्रशासनास टिळक चौकातील खवा विक्रेत्यांनी अनेकदा तोंडी, लेखी व समक्ष भेटून तक्रारी दिलेले आहेत. परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. उलट तक्रार केल्यानंतर भेसळयुक्त म्हणजेच 'गोड खवा' विक्रेत्यांकडून हप्ता वाढवून घेत असल्याचा आरोप ही टिळक चौक परिसरातील खवा विक्रेत्यांनी दैनिक कटूसत्यशी बोलताना केला. 

याबाबतची सत्य व खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन अधिकारी प्रदीप राऊत यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात जाऊन समक्ष भेट घेतली असता राऊत म्हणाले, माझ्याकडे यंत्रणा खूप कमी आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःच्या जीवाची काळजी स्वतः घेतली पाहिजे. भेसळयुक्त खवा घेऊ नये. भेसळयुक्त खवा विक्रेते आम्हाला सापडत नाहीत. प्रत्येक मिठाई दुकानाची तपासणी करणे आम्हाला अशक्य आहे. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर धाड टाकत असतो. असे गोल गोल उत्तरे देत, मी आता निवृत्तीला आलो आहे. असे सांगून टाकले. आम्ही 'गोड खवा' अनेकदा पकडलेला आहे. त्यांच्यावर कारवाईही केलेली आहे. परंतु त्यांच्याकडे केंद्राचा परवाना आहे. त्यांच्याकडे कोणत्या स्वरूपाचा परवाना आहे. असे विचारले असता राऊत म्हणाले, 'स्पेशल बर्फी व इंडियन मिठाई' म्हणून विक्रीचा परवाना आहे. परंतू 'स्पेशल बर्फी व इंडियन मिठाई' मध्ये योग्य ते व पाहीजे ते घटक त्यांच्याकडून वापरले जात नाहीत. त्यामुळे मिठाई दुकानदारास तो खवा म्हणून विकता येत नाही किंवा तो इतर मिठाईच्या पदार्थात भेसळ करू शकत नाहीत. असा भेसळयुक्त खवा विक्री करण्याचा परवाना दिला कसा असा प्रश्न विचारल्यानंतर राऊत म्हणतात ते त्या संबंधित अधिकाऱ्यांनाच विचारा. मात्र तो 'गोड खवा' मिठाई म्हणून विकू शकत नाहीत. 

त्यामुळेच सर्वसामान्यांना पडलेले प्रश्न असे आहेत की, केंद्र सरकारने असा भेसळयुक्त 'गोड खवा' विक्री करण्यासाठी परवाना दिला कसा? असा परवाना घेऊन खवा विक्री करण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तो परवाना रद्द करा असा अहवाल संबंधित कार्यालयाला का पाठवलेला नाही. 'गोड खवा' मिठाईत वापरला का नाही याची तपासणी कोण करणार? 

हप्तेखोर अधिकाऱ्यांमुळे दुहेरी नुकसान- (टिळक चौकातील खावा विक्रेते)

गोड खाव्याच्या नावाखाली बेसळयुक्त खवा अनेक विक्रेते निम्म्यादराने विक्री करतात. त्यामुळे 90% मिठाई दुकानदार हा भेसळयुक्त खवा वापरून जनतेच्या आरोग्याची खेळतात तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या दुधापासून बनवलेला ओरिजनल खावा विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे एवढेच म्हणावे असे वाटते की, हप्तेखोर अधिकाऱ्यांमुळे जनतेची न भरून येणारे दुहेरी नुकसान होत आहे. 

जनतेच्या आरोग्याची काळजी अन्न व औषध प्रशासनानेच घेणे बंधनकारक- अॅड. खतीब वकील (आम आदमी पार्टीचे जिल्हाप्रमुख)

खरंतर मिठाई दुकानदार, खावा विक्रेते, औषध दुकानदार, हॉटेल, चहा कॅन्टीन, टपऱ्या या व अन्य ठिकाणीच तपासणी करणे व त्यांच्यावर नजर ठेवणे. 

अशा ठिकाणी काही भेसळ होते का हे काम अन्न व औषध पुरवठा विभागाचेच आहे. अशा पद्धतीने आपल्यावरील जबाबदारी झटकून देऊन अधिकाऱ्यांना चालणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील तमाम जनतेची आरोग्याची काळजी अन्न व औषध प्रशासनानेच घेतली पाहिजे याबाबतचा तसा कायदा आहे.

चौकट:- संबंधित अधिकाऱ्यांनी खुर्चीला चिकटून न बसता प्रत्येक मिठाई दुकानांची कसून चौकशी केली पाहिजे. अन्यथा आम आदमी पार्टी सणासुदीत आंदोलन करणार. - सागर पाटील 


कसा ओळखाल भेसळयुक्त खवा?

दिवाळीच्या सणानिमित्त मिठाई खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केल्याचं चित्र सध्या दिसत आहे. मात्र या मिठाईमध्ये भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुधापासून किंवा खव्यापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये रासायनिक रंग किंवा अन्य पदार्थांची भेसळ केली जाते. याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं अशी भेसळयुक्त मिठाई ओळखण्यासाठी काही टिप्स:

भेसळयुक्त खवा

-प्रथम खव्याचा जवळून वास घ्यावा. खव्यात चिकटपणा नसल्यास त्यात भेसळ असण्याची शक्यता आहे.

-खव्याचा तुकडा घेऊन त्यावर हायड्रोक्लोरिक अॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास त्यात मेटॅनील यलो रंगाची भेसळ असल्याचं समजावं. 

​​कर्करोग होण्याचा धोका

नकली म्हणजेच सिंथेटिक दूधापासून बनवलेला खवा खाल्ल्यानं कर्करोग होण्याची शक्यता असल्याचं डॉक्टर सांगतात. भेसळयुक्त मिठाई खाल्ल्यानं विषबाधा, उल्टी, जुलाब यांसारखे आजारही मोठ्या प्रमाणात होतात. तसेच असे आरोग्यास घातक पदार्थ खाल्ल्यानं त्वचेचे रोग देखील होतात. शरीराला खाज येणं, सूज येणं तसेच शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होणं असे आजार होऊ शकतात. 

दिवाळीचा सर्व फराळ आता विकत मिळतो, पण हाताने केलेल्या फराळाची चव विकतच्या फराळाला कुठे? म्हणून आजही बहुतांश महिला घरातच दिवाळीचा फराळ बनवतात. यामागे असते करुन बघण्याची हौस आणि भेसळीचे भीती. 

सणवार जवळ आले की वर्तमानपत्रं आणि टीव्हीवर खाद्यपदार्थातील भेसळ्, त्यामुळे आजरी किंवा जीव गमावलेल्या लोकांच्या बातम्या येऊ लागतात. हे असे प्रसंग आपल्या बाबतीत घडू नये म्हणून महिला घरात फराळ करतात. लाडू, बर्फी, करंज्या तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खव्याचा उपयोग केला जातो. हा खवा बाहेरुन विकत आणला जातो. खवा हा शुध्दच असणार अशी खात्री असल्यामुळे तो मिठायांमधे वापरला जातो आणि खवा भेसळयुक्त असेल तर मग मात्र त्रासाला, आजारपणाला आमंत्रण मिळतं. 

खव्यातील भेसळ ही आता सामान्य बाब झाली आहे. त्यापासून ग्राहक म्हणून आपणच सावधान असायला हवं ही काळाची गरज आहे. त्यासाठी दोन उपाय एक तर भेसळयुक्त खवा घेऊ नये आणि दुसरा उपाय म्हणजे खवा घरीच तयार करावा. दुसरा पर्याय जरा वेळ खाऊ असल्यानं विकतचाच खवा जागरुकपणे घेणं हा उत्तम पर्याय आहे. जागरुकपणे खवा घेण्यासाठी शुध्द खवा, भेसळयुक्त खवा यातील फरक ओळखता यायला हवा. खव्यातील भेसळ सहज ओळखता येते. तज्ज्ञांनी यासाठी छोटे छोटे प्रयोग सांगितले आहेत.

खव्यात भेसळ.. कशी ओळखणार?

1.खव्यात प्रामुख्यानं रताळी, शिंघाडा पीठ, वनस्पती तूप, स्टार्च यांची भेसळ केली जाते. भेसळयुक्त खवा हातावर घासल्यास घाण वास येतो. भेसळ असलेला खवा खाल्ला की तो टाळुला चिकटतो.

2. खवा शुध्द आहे की नाही हे ओळखण्यासाठी थोडा खवा हातावर घेऊन घासून बघावा. खव्याचा पोत दाणेदार असला , तो हातावर चोळल्यानंतर हात तेलकट झाले आणि हाताला शुध्द तुपासारखा वास आला म्हणजे खवा शुध्द आहे हे समजावं. तसं नसेल तर त्यात भेसळ आहे हे समजावं.

3. शुध्द खवा ओळखण्याची तिसरी पध्दत अन्न मानक आणि सुरक्षा प्राधिकरण यांनी सांगितल्यानुसार एक चमचा खवा घ्यावा तो एक कप गरम पाण्यात मिसळावा. नंतर कपामधे आयोडीनचे काही थेंब टाकावेत. आयोडीन टाकल्यानं गरम पाण्यात मिसळलेला खवा जर निळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ झाली आहे हे समजावं. आणि तसं झालं नाही तर मात्र खवा शुध्द आणि वापरण्यास सुरक्षित आहे हे समजावं.

Reactions

Post a Comment

0 Comments