नाशिक तपोवनातील वृक्षतोडीस संभाजी ब्रिगेडचा विरोध
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नाशिक येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्यासाठी भारतातून वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात साधुसंत काही कालावधीसाठी येणार आहेत पण येणाऱ्या साधुसंतांच्या राहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासाठी काही कालावधीसाठी सरकारतर्फे निवासाची जी व्यवस्था करण्यात येणार आहे त्यासाठी नाशिक येथील तपोवनातील 1700 ते 1800 पूर्ण वाढ झालेली झाडांची तोड करण्यात येणार आहे हे योग्य आहे का एकीकडे सरकार झाडे लावा झाडे जगवा म्हणून जाहिरात करते आणि दुसरीकडे काही कालावधीसाठी येणाऱ्या साधू संतांसाठी निवासाची व्यवस्था करण्यासाठी इतिहासकालीन तपोवनातील नाशिकच्या भूमीतील झाडांची एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करते ज्या श्रीरामाच्या नावाने नाशिक येथील भूमी प्रसिद्ध आहे त्या भूमीत श्रीराम हे या तपोवनात राहुटी करून राहिले होते आणि ज्या श्रीरामाचे नाव घेऊन हे साधुसंत या नाशिकच्या भूमीत कुंभ मेळाव्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी एसी व बांधलेल्या दगड मातीच्या निवासस्थानाची व्यवस्था हे काही आम्हास पटत नाही जर साधुसंतांना राहण्याची व्यवस्थाच करायची असेल तर ती तात्पुरत्या स्वरूपात राहुटी उभारून किंवा टेन्ट मारून ही करण्यात येऊ शकते त्यासाठी तपोर्णातील एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्याची काहीही गरज नाही किंवा अनाटाही जनतेचा पैसा निवासस्थानासाठी खर्च करण्याची ही गरज नाही हा निवासस्थानाचा पैसा महाराष्ट्रातील अडीअडचणी सोडवण्यासाठी होऊ शकतो एकीकडे सरकार ओळीत दुष्काळाने ग्रासलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला काडीमात्र मदत करते व अशा प्रकारे कुंभ मेळाव्याच्या नावाखाली हजारो कोटी खर्च करून अनाठही पैसा खर्च करते यात भ्रष्टाचारालाही भरपूर वाव आहे म्हणून जर आपण आज तपोवनातील झाडांची उंची व वयोमान बघितले तर यामध्ये कितीतरी कुंभमेळावे बघितलेली हेरिटेज झाडे आहेत व ती देशी स्वरूपातील वाणाची आहेत तपोवन म्हणजे जिथे साधुसंत बसून तप करू शकतात अशी वने म्हणजे तपोवन अशी झाडे जर आपण तोडले तर भारतीय संस्कृतीचा काय संदेश जगाला आपण देणार आपल्या किती तर पिढ्या हे झाडे लावण्यासाठी जातील आणि या तपोवनातील वनात किती तर साधुसंतांनी आपली तपश्चर्या या अगोदर पूर्ण केली असेल असे तपोवन नष्ट करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे वृक्ष हे आपल्या सृष्टीतील एक महत्वाच घटक आहेत. वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाने बेसुमार वृक्षतोड झाली आहे. सरकारच वृक्षलागवड योजना पुर्ण फसली आहे.
यातच नाशिक येथील कुंभ मेळयातील काही दिवसाच्या निवासस्थानासाठी 1800 पुर्ण वाढ झालेली झाड तोडण्यास आमचा तीव्र विरोध आहे. 1800 नष्ट होणे म्हणजे यावर अवलंबून असलेल्या हजारो लाखो कीटक जंतू प्राणी त्याचबरोबर ऑक्सिजन याचीही मोठी हानी होणार आहे आणि सरकार एक झाडाला झाडे लावणार ही जी घोषणा केलेली आहे यात सरकारनेच सांगावे की अशी झाडे येण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागू शकतो आणि ही सर्व झाडे जगू शकतात का म्हणून आम्ही संभाजी ब्रिगेड तर्फे जन आंदोलन महाराष्ट्रात उभे करून या विरोधात नाशिक येथील तपोवनात येवून झाड वाचवण्यासाठी आम्ही आमचे बलिदान देवू एवढा मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड करून पर्यावरणाचे हानी करून जर सरकार निवासस्थाने बांधत असतील तर त्यास संभाजी ब्रिगेड सडेतोड उत्तर देणार व नाशिकच्या ऐतिहासिक तपोवनातील वृक्षतोड करण्यास पूर्णपणे विरोध करणार व रस्त्यावर उतरून संभाजी ब्रिगेड त्यावर प्रत्युत्तर देणार या सर्वस्वी सरकार जबाबदार असेल म्हणून आम्ही मुख्यमंत्री वनमंत्री पर्यावरण खात्यास व आपणास या निवेदनाद्वारे विनंती करतो की नाशिक येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्यासाठी तपोवनातील कुठल्याही वृक्षाची तोड होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी व यावर पर्यायी मार्ग काढावा याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महानगर प्रमुख शिरीष भैया जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनलदास शहराध्यक्ष मनीषा कोळी वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍड गणेश कदम जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे, राजेंद्र माने जिल्हा सचिव, दिलीप निंबाळकर जिल्हा कार्याध्यक्ष, जयश्री जाधव जिल्हा उपाध्यक्ष, माधुरी चव्हाण शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे दिलीप भोसले व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
0 Comments