Hot Posts

6/recent/ticker-posts

बळीरामकाका साठे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

 बळीरामकाका साठे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीरामकाका साठे यांचा तीन आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निश्चित झालेला प्रवेश गुरुवारी होणार असून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वडाळा येथे हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्ष प्रवेश करणार आहेत .याचदरम्यान कार्यकर्ता संवाद मेळाव्याचेही यावेळी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खुद्द साठे यांनी दिली.

गेली साठ वर्षांपासून देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून राजकीय सहा दशकांचा राजकीय प्रवास केलेले काका साठे यांना विश्वासात न घेता चार महिन्यांपूर्वी त्यांच्याकडून जिल्हाध्यक्षपद काढून घेतले. तेव्हापासून साठे अस्वस्थ होते. आता खा.शरद पवार यांच्या पक्षात राहणे नाही, असे जाहीर केल्यानंतर त्यांना भाजपात येण्यासाठी आमदार सुभाष देशमुख, शिवसेनेत (एकनाथ शिंदे) येण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा अध्यक्ष अमोलबापू शिंदे यांनी आग्रह धरला होता. मात्र, बहुतांशी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले बरे, असा सल्ला दिला.

अशातच तीन आठवड्यापूर्वी या पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी वडाळा येथे येऊन काका साठे यांची भेट घेऊन अजितदादांच्या पक्षात येणे कसे योग्य राहील, यावर एक तास चर्चा केली. थेट अजित पवार यांच्याशी बोलणे करुन दिले. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी काका साठे हे अजित पवार यांना नातू जयदीप साठे यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मुंबईला गेले असता मी तुमच्या सोबत असल्याचे साठे यांनी सांगितले. मात्र, अधिकृत प्रवेश कधी, याकडे सा-या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून गुरुवारी (दि.27) सकाळी दहा वाजता अजित पवार वडाळा येथे येणार आहेत.

यावेळी वडाळा येथील विठ्ठल मंगल कार्यालयात साठे यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव व वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, काका साठे यांचे नातू जयदीप साठे उपसरपंच अनिल माळी, प्रल्हाद काशीद, मार्डीचे उपसरपंच श्रीकांत मार्तंडे, शशिकांत मार्तंडे, प्रशांत काशीद, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments