संविधान दिन व शहिददिन कुमठे प्रशालेत साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सविंधान पत्रिकेचे वाचन करुन कुमठे प्रशालेत संविधानदिन साजरा करन्यात आला. या प्रसंगी प्रशालाचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड, पर्यवेक्षक वसंत गुंगे. ज्युनियर कालेज विभाग प्रमुख प्रा संजय जाधव उपस्थित होते. याप्रसंगी प्रशालेतील सहशिक्षीका सुवर्णा धारेराव यांनी सविधानदिनाचे महत्व विदयार्थ्यांना विशद केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व सविधानाचे महत्व विशद करताना डाॅ बाबासाहेबांचे योगदान परिश्रम मेहनत अभ्यास आजच्या विदयार्थ्यांनी घ्यावा व आपण अभ्यास करावा असे मत मांडले तसेच प्राचार्य गायकवाड यांनी सविंधान उद्देशिकेचे वाचन करुन विदयार्थ्यांमा प्रतिज्ञा दिली. तसेच या कार्यक्रम प्रसंगी नवनित चित्रकला स्पर्धा घेन्यात आल्या होत्या या मधे प्राविण्य मिळविलेल्या विदयार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविन्यात आलेया कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रिडाशिक्षक संजय घोडके यांनी केले तर आभार शांतप्पा काळे यांनी मानले.
.png)
0 Comments