Hot Posts

6/recent/ticker-posts

आपल्या मोहोळला भाजपच्या संकल्पनेतील पुढील पन्नास वर्षाच्या विकासाच्या व्हिजनकडे घेऊन जाण्यासाठीच आम्ही प्रयत्नशील

 आपल्या मोहोळला भाजपच्या संकल्पनेतील पुढील पन्नास वर्षाच्या विकासाच्या व्हिजनकडे घेऊन जाण्यासाठीच आम्ही प्रयत्नशील




भाजपाचे निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर यांची मोहोळ मध्ये ग्वाही

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहोळमध्ये भाजपचा वचननामा जाहीर

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-  देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वात देश व राज्य प्रगतीच्या दिशेने दिमाखात वाटचाल करीत आहे.मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्यासह  नगरसेवक पदाचे सर्वच्या सर्व वीसही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करत आम्ही कोणावरही टीकाटिप्पणी करणार नाही.कोणाच्या टीकेला उत्तर देण्यात आपली वेळ न गमावता मोहोळ शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन वाटचाल करणार आहोत त्यामुळे शहरातील सर्व सुजाण मतदारांनी भाजपासोबत म्हणजे विकासासोबत रहावे असे आवाहन मोहोळ नगरपरिषद निवडणूक भाजपचे प्रभारी सुशील क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केले.
भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार शितल क्षीरसागर या उच्चशिक्षित आणि कार्यक्षम उमेदवार असल्यामुळे येत्या काळात आपल्या मोहोळ शहराला स्मार्ट मोहोळ सिटी बनवण्यासाठी त्यांच्या विजयाचा निश्चितपणे मोठा फायदा होणार आहे असेही यावेळी सुशील क्षीरसागर म्हणाले.
      मोहोळ येथे अहिल्या पार्क येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सुशील क्षीरसागर पत्रकारांशी संवाद साधत होते.त्यांनी पुढे सांगितले की,मागील निवडणुकीत ही आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.मात्र भाजपाचे दोनच नगरसेवक निवडून आल्याने त्या जाहिरनाम्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही मात्र भाजपच्या ताब्यातील प्रभाग दहा हा सर्वांगीण सोयी सुविधांनी संपन्न झाला. आता या निवडणूक भाजपाला चांगले वातावरण आहे.पालकमंत्री ना.जयकुमार गोरे , माजी आमदार राजन पाटील , माजी यशवंत माने, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण , आमचे मार्गदर्शक नागनाथ क्षीरसागर या सगळ्यांच्या ताकदीमुळे भाजपा मजबूत झाला आहे.नक्कीच आम्ही नगराध्यक्ष व २० नगरसेवक निवडून आणू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला,.
मोहोळ शहरासाठी आम्ही  नागरिकांना सर्व शासकीय योजनेचा लाभ तर मिळवून देणारच आहोत पण शहरात चांगले रस्ते,वीज ,पाणी स्वच्छता या बाबींकडे ही लक्ष देणार आहोत, मोहोळ शहरात ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी , क्रीडा संकुल होण्यासाठी , मोहोळ शहराला शाश्वत पाणी पुरवठा व शुद्ध पिण्याचे पाणी देऊन , युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणार आहोत.तसेच इनडोअर व आउटडोअर स्टेडियम करून शहरासह तालुक्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा आहोत असेही यावेळी क्षीरसागर म्हणाले.
   त्याच बरोबर ' करा योग आणि रहा निरोग ' याचा विचार करून शहरात एक योगा सेंटर सुरू करण्याचा मानस आमचा आहे.त्याच बरोबर आरोग्याबाबत  ओपन जिम तसेच तरूणांना व वयोवृद्धांना चालण्यासाठी एक अत्याधुनिक असा ट्रॅक बनविण्याचा सुद्धा आमचा मानस आहे.कोणावर ही टीका करून , कोणाला बदनाम करून मते मिळत नसतात तर त्याच्यासाठी एक विकासाचे व्हिजन असावे लागते,आणि ते व्हिजन पूर्ण करण्यासाठी सत्ता व निधी मिळणे आवश्यक असते.आज सबका साथ सबका विकास हे धोरण केंद्र सरकार व राज्य सरकारने आवलंबले आहे.मोहोळ शहराला स्मार्ट सिटी बनविण्याची ताकद फक्त भाजपा मध्येच आहे.त्यामुळे मोहोळकरांनी भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असेही सुशील क्षीरसागर यावेळी म्हणाले.यावेळी जेष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, मुजीब मुजावर, चिटणीस महेश सोवनी ,अविनाश पांढरे आदी उपस्थित होते.

चौकट .........

'  शहराची स्वच्छता व महिला सक्षमीकरणा साठी प्रयत्न करणार '

पूर्वी महिलांकडे चूल आणि मूल या भूमिकेतून पाहिले जात होते . मात्र आता महिला ही अबला नसून सबला झालेली पहावयास मिळते आहे.मोहोळ शहरात आजही सार्वजनिक स्वच्छता गृहांची संख्या अपेक्षित प्रमाणात नाही.तालुक्यातील खेडेगावातून आलेल्या नागरिकांची खास करून महिलांची मोठी कुचंबणा होताना पहावयास मिळते आहे. यासाठी मेट्रोसिटीच्या धरतीवर शासकीय कार्यालय परिसरात अद्यावत स्वच्छतागृहांची निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू . मोहोळ शहराला एक स्वच्छ आणि विकसित शहर करणे हा प्रमुख अजेंडा आहे. मोहोळ शहराला शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे हे प्राथमिक काम आहे.शहरातील बऱ्याच महिलां भगीनींच्या हाताला काम नाही,त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी व महिलां सक्षमीकरणासाठीच माझी या निवडणुकीतील उमेदवारी आहे आहे.

शीतल सुशील क्षीरसागर
नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार
Reactions

Post a Comment

0 Comments