अत्याचार प्रकरणी व ॲट्रासिटीच्या गुन्हयातून प्रियकराची निर्दोष मुक्तता- ॲड मिलिंद थोबडे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नामांकित बँकेतील अधिकारी महिलेस लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार देऊन फसवणुक केल्याप्रकरणी दाखल गुन्हयातून आदित्यकुमार श्रीइंद्रदेव झा उ.व. ३० रा. २९. पद्मानगर सोलापूर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, एका नामांकित बँकेमध्ये फिर्यादी अविवाहीत तरूणी व आदित्यकुमार झा हे अधिकारी म्हणून कार्यरत होते. सन २०१४ मध्ये सदर तरूणी व आदित्यकुमार यांची पुणे येथे प्रशिक्षणा दरम्यान ओळख निर्माण झाली व तदनंतर दोघांची बदली सोलापूर येथे झाली, दि. २६/०१/२०१५ रोजी आदित्यकुमारने लग्न करतो असे आश्वासन देऊन हॉटेलच्या रूममध्ये सुरूवातीस सदर तरूणीवर अत्याचार केला व त्यानंतर वेळोवेळी राहत्या फ्लॅटवर व तरूणीच्या घरी दि.०३/०२/२०१६ रोजी पर्यंत शारीरिक संबंध प्रस्थापित केले व दि. २८/०५/२०१६ रोजी आंतरजातीय विवाह माझ्या घरच्यांना मान्य नाही असे कारण सांगून लग्न करण्यास नकार दिला व तरूणीस तिच्या जातीवरून अपमानित केले अशा आशयाच्या पिढीत तरुणीच्या फिर्यादीवरून आदित्यकुमार यांचेविरूध्द बलात्कारासह ॲट्रासिटीचा गुन्हा विजापूर नाका पोलीस ठाण्यात दि. ३०/०८/२०१६ रोजी दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त महेश जोशी यांनी करून आरोपीविरूध्द दोषारोपपत्र मे. न्यायालयात पाठवले होते.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याचे अंतिम युक्तीवादावेळी ॲड. मिलिंद थोबडे यांनी आरोपीची बाजू मांडताना आपले युक्तीवादामध्ये अशा प्रकरणामध्ये सुरूवातीपासून लग्न करण्याचा उद्देश नसताना लग्न करतो असे खोटे आश्वासन दिल्याचे शाबित झाल्यास आरोपीस दोषी धरता येईल व प्रस्तुत प्रकरणामध्ये सरकार पक्षाने आरोपीचा सुरूवातीपासून लग्न करण्याचा हेतू नसताना देखील लग्नाचे आश्वासन दिले होते ही बाब शाबित करण्यात आलेली नाही. तरूणीचे आरोपावरून पुर्णपणे संमतीने शारीरिक संबंध झाल्याचे दिसून येत असल्याने तरूणीवर बलात्कार करण्यात आला. असे म्हणता येणार नाही व केवळ लग्नास नकार दिल्याने पुर्ण संमतीने झालेले शारीरिक संबंध बलात्काराच्या व्याख्येत येत नसून अशा परिस्थितीत आरोपीचा सुरूवातीपासून तरुणीशी लग्न करण्याचा उद्देश नव्हता असे म्हणता येणार नाही असे मुद्दे मांडून त्या पृष्ठ्यर्थ में. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले ते ग्राह्य घरून सोलापूर येथील प्रमुख जिल्हा न्यायाधिश मनोज शर्मा यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपी तर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. राजकुमार मात्रे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. आनंद कुर्डुकर यांनी तर मुळ फिर्यादीतर्फे ॲड. शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले.
.png)
0 Comments