सोलापूरला जागतिक युनिफॉर्म हब बनविण्यास कटिबद्ध- राहुल नार्वेकर
मुंबई (कटूसत्य वृत्त):- सोलापूरला जागतिक युनिफॉर्म हब बनविण्यास कटिबद्ध असल्याचे म्हटले. तसेच सोलापूर येथे शासनातर्फे कौशल्य प्रशिक्षण केंद्र देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. यांच्या हस्ते "९ व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२५"चे शानदार उद्घाटन संपन्न झाले.
आज बुधवार २६ नोव्हेंबर रोजी सकाळी नेस्को एक्झिबिशन सेंटर, हॉल क्रमांक ४, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे "सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन" (SGMA) तर्फे आणि महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे माजी वस्त्रोद्योग मंत्री व आमदार सुभाष देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये १५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्स सहभागी होत असून ३०,००० युनिफॉर्म डिझाईन्स, १५,००० फॅब्रिक इनोव्हेशन्सचे प्रदर्शन येथे होणार आहे. भारतातील युनिफॉर्म उद्योगातील पहिला ‘एआय’ आधारित व्हर्च्युअल फॅशन शो या प्रदर्शनात आयोजित केला गेला आहे. ६५ अब्ज डॉलर्सच्या जागतिक युनिफॉर्म मार्केटमध्ये वाढीच्या संधी उघडणारे “मेक इन इंडिया”ला पाठबळ देणारे हे एक महत्त्वाचे बी२बी व्यासपीठ आहे.
पुढे बोलताना म्हणाले नार्वेकर की महाराष्ट्र शासनातर्फे सोलापूरला जागतिक स्तरावरील गारमेंट हब बनविण्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आणि विधिमंडळात याची चर्चा करू. सोलापूरला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर गारमेंट हब बनविण्यासाठी प्रयत्न करू. सोलापूर जागतिक केंद्र बनण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व आहे जसे विमानतळ, कुशल कामगार इथे उपलब्ध आहे. त्यामुळे सोलापूरला जागतिक गारमेंट हब होण्याची पूर्ण संधी आहे,” असे ते म्हणाले.
नार्वेकर पुढे म्हणाले की, “जोपर्यंत कौशल्य प्रशिक्षण केंद्र होत नाही, तोपर्यंत जागतिक स्तरावर स्पर्धा करणे कठीण असते. कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सोलापूरची मागणी जुनी आहे. त्यासाठी आमदार आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी भरपूर पाठपुरावा केला आहे. हे केंद्र लवकरच मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील आणि मी स्वतः त्यात लक्ष घालीन,” असे वचन त्यांनी यावेळी दिले.
सुभाष देशमुख म्हणाले की, वार्षिक प्रदर्शनाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत असून ते आता अंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जाण्याचा मानस आहे. “मी वस्त्रोद्योग मंत्री असताना सोलापूरपासून सुरु झालेले हे गारमेंट प्रदर्शन देशाच्या विविध राज्यांमध्ये आयोजित केले गेले. त्याला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. जागतिक स्तरावरसुद्धा त्याचा बोलबाला झाला आहे. आता लवकरच हे प्रदर्शन जागतिक स्तरावर भरविण्याचा आमचा मानस आहे,” ते म्हणाले.
२०१७ मध्ये सोलापूर येथे प्रथम झालेल्या या प्रदर्शनाचा प्रवास आज मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि वाराणसीपर्यंत पोहोचला आहे. ‘मेक इन इंडिया’ला चालना देणारे देशातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित युनिफॉर्म B2B व्यासपीठ म्हणून या फेअरने निश्चितच ओळख निर्माण केली आहे.
या तीन दिवसीय फेअरमुळे युनिफॉर्म उद्योगात व्यवसाय वृद्धीसाठी, नव्या भागीदारींसाठी आणि डिझाइन-तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाची प्रस्तावना फेअर चेअरमन अजय रंगरेज यांनी केले तर आभार सचिव श्रीकांत अंभोरे यांनी मानलं.
.png)
0 Comments