Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर - जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे,तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर : प्रभाग बैठका, भेटीगाठी, विकास कामांचा शुभारंभ,गप्पागोष्टी तसेच पक्षप्रवेशाचे सोलापुरात भरगच्च कार्यक्रम !

 सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर - जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे,तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर  : प्रभाग बैठका, भेटीगाठी, विकास कामांचा शुभारंभ,गप्पागोष्टी तसेच पक्षप्रवेशाचे सोलापुरात भरगच्च कार्यक्रम  !




सोलापूर - ( प्रतिनिधी ) - आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार सोलापूर शहर - जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर जिल्ह्याचे नूतन सहसंपर्क मंत्री तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे गुरुवार २७ नोव्हेंबर ते शनिवार २९ नोव्हेंबर असे तीन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या तीन दिवसांमध्ये प्रभाग बैठका, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, विविध विकास कामांचा शुभारंभ, गप्पागोष्टी, तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा सोहळा,आदी कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती, शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे नेते तौफीक शेख आणि ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 
  राष्ट्रवादीचे सहसंपर्कप्रमुख अण्णा बनसोडे यांचे गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर तेथेच दुपारी २ वाजता सर्वप्रथम पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी अडीच वाजता प्रभाग क्रमांक १५ आणि १६ येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३.५० वाजता रोजंदारी कामगारांना कायम करण्यासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे बैठक होणार आहे.त्यानंतर दुपारी ४.१० वाजता जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनमध्ये अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात विविध पक्षातील प्रमुखांचा पक्ष प्रवेश होणार आहे. 
  ५ वाजता मिलिंद नगर बुधवार पेठ येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे व विष्णू निकंबे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
   दुपारी साडेपाच वाजता न्यू बुधवार पेठेतील चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांशी गाठीभेटी होऊन सायंकाळी ६ वाजता न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या समोरील रस्त्यावर प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.
रात्री सात वाजता प्रभाग क्रमांक ६ व ७ मधील धरमसी लाईन येथे बैठक होणार असून त्यानंतर विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री ८ वाजता प्रभाग १४ मधील विजापूर वेस येथे चौकाच्या सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ अण्णा बनसोडे यांच्या हस्ते पार पडणार आहे.राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. रात्री ९ वाजता बाळीवेसेतील कसबा गणपती येथे अण्णा बनसोडे हे गणपतीचे दर्शन घेऊन आरती करणार आहेत. त्यानंतर आनंद मुस्तारे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. रात्री साडेनऊ वाजता शासकीय विश्रामगृह येथे अण्णा बनसोडे हे थांबणार आहेत.
   शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सह संपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्याला दमानी नगर येथून सुरुवात होणार आहे. या भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लखन भंडारे तसेच सलीम नदाफ यांच्या भागात ते सदिच्छा भेट देणार आहेत. सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी दमानी नगरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शामराव गांगर्डे यांच्या निवासस्थानी अण्णा बनसोडे सदिच्छा भेट देतील. तसेच सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी कर्णिक नगर येथे माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच सकाळी ११ वाजता प्रियदर्शनी नगरातील जी ग्रुप  घरकुल येथे श्री. हॉलमध्ये प्रभाग क्रमांक ९, १० आणि ११ संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून अण्णा बनसोडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सव्वा बारा वाजता जुना तुळजापूर नाका येथील ५१ फुटी श्री हनुमानाचे दर्शन घेणार आहेत. खान संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी अण्णा बनसोडे माजी नगरसेवक सिद्धेश्वर आनंदकर यांच्या निवासस्थानी भेट देतील. तर साडेबारा वाजता शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी लीगल सेलच्यावतीने विधी तज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जयकुमार भंडारे यांनी ही बैठक आयोजित केली आहे.
    दुपारी दीड वाजता आरटीओ ऑफिस जवळील नालंदा बुद्ध विहार येथे बुद्ध वंदना होणार आहे अनिल बनसोडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानंतर अण्णा बनसोडे हे अनिल बनसोडे यांचे निवासस्थानी भेट देतील दुपारी अडीच वाजता प्रताप नगर रोड वरील निर्मिती गणेश येथे राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्या निवासस्थानी, त्यानंतर ३ वाजता विजापूर रस्त्यावरील रफिक शेख,त्यानंतर प्रवीण साबळे तसेच अनिकेत व्हसुरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.
    दुपारी चार वाजता जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात प्रभाग क्रमांक २४ आणि २६ मधील कार्यकर्त्यांची बैठक होणार असून अण्णा बनसोडे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता प्रभाग ४ मधील वडार गल्ली येथील नितीन बंदपट्टे यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर बाळीवेस वडार गल्ली येथील बंटी यमपुरे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन अण्णा बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे. 
  सम्राट चौकातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा तसेच  इंद्रमल जैन यांच्या निवासस्थानी भेट झाल्यानंतर पाच वाजून ५० मिनिटांनी शास्त्री नगरातील मोहसीन नदाफ यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अण्णा बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे.
   सायंकाळी सहा वाजता शास्त्रीनगर येथे प्रभाग क्रमांक १७ १८ व १९ येथील कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. तसेच पूजा धोत्रे यांचा अण्णा बनसोडे  यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.सायंकाळी ७ वाजता रामवाडी येथील अंबाबाई मंदिर च्या पाठीमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवनाच्या कामाचा शुभारंभ सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
  रात्री ८ वाजता नई जिंदगी येतील हॅप्पी हाऊस येथे प्रभाग क्रमांक २०, २१ आणि २५ येथील पदाधिकाऱ्यांची अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. रात्री ९ वाजता नजीब शेख यांच्या निवासस्थानी अण्णा बनसोडे हे काही वेळ थांबणार आहेत. तर रात्री दहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे अण्णा बनसोडे यांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
    शनिवार २९ नोव्हेंबर रोजी गुरुनानक चौकातील ऑफिसर्स क्लब येथे राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांनी चहापानाचा कार्यक्रम ठेवला आहे.त्यानंतर साडेनऊ वाजता सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे हे दक्षिण सदर बझार येथील भारत हाउसिंग सोसायटीमधील प्रवीण वाडे यांच्या निवासस्थानी भेट देतील. सकाळी १० वाजता सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन होणार असून आनंद मुस्तारे हे संयोजक आहेत.सकाळी साडेदहा वाजता शहेनशहा शहाजहूर वली दर्गाह येथे अण्णा बनसोडे दर्शन घेतील. त्यानंतर पावणे अकरा वाजता श्री मार्कंडेय महामुनी मंदिरात दर्शन झाल्यानंतर दुपारी ११ वाजता मोदी येथील जगजीवनराम झोपडपट्टी मधील सिद्धार्थ सामाजिक संस्थेस, त्यानंतर फॉरेस्ट बुद्ध नगरातील प्रबुद्ध सामाजिक संस्था येथे भेट देणार आहेत.
  सकाळी साडेअकरा वाजता प्रभाग क्रमांक १२ व १३ येथे राष्ट्रवादीचे नेते वसीम बुऱ्हाण यांनी बैठकीचे आयोजन केले आहे.अशोक चौकात होणाऱ्या या बैठकीला अण्णा बनसोडे मार्गदर्शन करणार आहेत.
  दुपारी साडेबारा वाजता मंगळवार बाजार येथील गोविंद मेडिकल दुकानाचे उद्घाटन होणार आहे. तर दुपारी १ वाजता समीर पांडगळे यांच्या संयोजनाखाली भवानी पेठ मड्डी वस्ती येथील एसपी चौकातील सारनाथ बुद्ध विहार येथे अण्णा बनसोडे भेट देणार आहेत. दुपारी १ वाजून २० मिनिटांनी भवानी पेठ भाजी मार्केट येथील इरफान युन्नूस शेख यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर दुपारी दीड वाजता बाळे येथील माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्या संयोजनाखाली श्री खंडोबा मंदिर येथे अण्णा बनसोडे श्री. खंडोबाचे दर्शन घेणार आहेत.
  त्यानंतर दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या एसपी हॉल्ट फार्म हाऊस येथे सह संपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांच्यासोबत माध्यम प्रतिनिधी यांचा संवाद आणि गप्पागोष्टी चा कार्यक्रम होणार असून त्यानंतर तीन दिवसाच्या सोलापूर दौऱ्याचा समारोप होणार असल्याचेही
  शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान जेष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे आणि राष्ट्रवादीचे नेते तौफीक शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
  या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस आनंद मुस्तारे,सचिव इरफान शेख,महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, नजीब शेख,चाचा सोनवणे, गणेश पुजारी, वैभव गंगणे, रुपेशकुमार भोसले, अमीर शेख, भास्कर आडकी,सुरेखा घाडगे, दत्तात्रय बनसोडे,श्रीकांत वाघमारे आदी
उपस्थित होते....
Reactions

Post a Comment

0 Comments