कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह व जन्मशताब्दी वर्ष निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 8, 2022

कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह व जन्मशताब्दी वर्ष निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

 कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह व जन्मशताब्दी वर्ष निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न


सांगोला (कटूसत्य वृत्त):- कै. गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके ४१ वा स्मृती समारोह व जन्मशताब्दी वर्ष निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे करण्यात आले होते. ही स्पर्धा ५ वी ते ७ वी गटामध्ये संपन्न झाली. सदर वक्तृत्व स्पर्धेमध्ये तालुक्यातून ३२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये उपस्थित स्पर्धकातून प्रथम पात्रता फेरीच्या सहाय्याने एकूण नऊ स्पर्धकांची निवड मुख्य फेरीसाठी करण्यात आली. मुख्य फेरीमध्ये पात्रता फेरीतून पात्र स्पर्धकांनी आपापले वक्तृत्व सादर केले. यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी प्रणिती राजेंद्र पवार (पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूल ,य.मंगेवाडी) द्वितीय क्रमांक कुमारी स्नेहल विलास जानकर (उत्कर्ष माध्यमिक विद्यालय, सांगोला) तृतीय क्रमांक  साक्षी दशरथ मोरे (न्यू इंग्लिश स्कूल ,लोटेवाडी) चौथा क्रमांक कुमारी आराध्या ऋषिकेश पाटील (सांगोला विद्यामंदिर प्रशाला ,सांगोला) पाचवे ग्रामीण स्पर्धकांसाठी क्रमांक कुमारी वैष्णवी कुंडलिक इंगोले (एस.एम.लिगाडे विद्यालय ,अकोला) या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले.
सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून माधव खरात ,प्रा.सागर बेलापूरकर,युवराज भोसले यांनी काम पाहिले.
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभावेळी सागर बेलापूरकर यांनी मनोगतातून स्पर्धा म्हटले की जिंकणं हरणं हे आलंच ,सांगोला भूमी ही जशी डाळिंबाची भूमी आहे तशी ती वक्तृत्वाची भूमी आहे .असे मत व्यक्त करत स्पर्धकांचे कौतुक केले. 
 पारितोषिक वितरण समारंभावेळी मा.संस्थाअध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,संस्था सचिव म. शं .घोंगडे, संस्था सदस्य दि.धो जगताप, प्राचार्य भिमाशंकर पैलवान , प्राचार्य नारायण विसापुरे, प्राचार्य अमोल गायकवाड,उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक बिभीषण माने, पोपट केदार,अजय बारबोले तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक ,विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भिमाशंकर पैलवान तर सूत्रसंचालन  शैलजा झपके यांनी केले  तर आभार उन्मेश आटपाडीकर यांनी मानले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages