मतदान ओळखपत्रास आधार लिंक: गौडवाडी गावाचे होतेय सर्वत्र कौतुक

सांगोला (कटूसत्य वृत्त):- गौडवाडी ता.सांगोला गावाने मतदार यादी आधार लिंक 100% पूर्ण केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. गौडवाडी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष कर्मचारी अमोल जगधने यांचा सत्कार प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांच्या हस्ते करण्यात आला.
ग्रामपंचायत गौडवाडी सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेविका,मदतनिस ,अंगणवाडी सेविका रेशन दुकानदार. हातेकर ई-सेवा केंद्रचे मालक शशी हातेकर तसेच फिनो बँक मॅनेजर पिंटू माळी.पोलीस पाटील zp शिक्षक यांनी डाटा उपलब्ध करून दिला व सर्वांनी गावातील लोकांना आधार लिंक करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले सर्वांनी सहकार्य केले व गावातील लोकांनी निसंकोच पणे मोबाईल वर आधार कार्ड पाठवली त्यांचे हे श्रेय आहे. आम्ही फक्त डाटा अपलोड केला आहे . असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगून नागरिकाचे आभार मानले.
No comments:
Post a Comment