गुरुवर्य बापूसाहेब झपके ४१ स्मृती समारोह जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 7, 2022

गुरुवर्य बापूसाहेब झपके ४१ स्मृती समारोह जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

 गुरुवर्य बापूसाहेब झपके ४१ स्मृती समारोह जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

 ऋषी पैलवान व विश्वतेज जाधव प्रथम 

     सांगोला (कटूसत्य वृत्त):-  सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष,थोर स्वातंत्र्यसेनानी,शिक्षण महर्षी कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या ४१ व्या स्मृतीसमारोहानिमित्त गुरूवार दि.०७ सप्टेंबर २०२२ रोजी  इ.८ वी ते १०वी गट,इ.११वी ते १२ वी गटासाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे उत्साहात संपन्न झाल्या.या  स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ते दहावी गटामध्ये एकूण ५७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तर अकरावी ते  बारावी गटांमध्ये ३२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास   परीक्षक,स्पर्धक विद्यार्थी व पालक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी  विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेत इयत्ता ८ ते १० वी गट जिल्ह्यस्तरीय  वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमार ऋषी भारत पैलवान उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सांगोला  द्वितीय क्रमांक कुमार पृथ्वीराज मारुती जाधव न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी, तृतीय क्रमांक श्राविका संपत जाधव सुलाखे विद्यालय बार्शी चतुर्थ क्रमांक कुमारी तनिष्का परमेश्वर सुरवसे जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर पाचवा  क्रमांक फक्त सांगोला तालुका  स्पर्धकासाठी कुमारी साक्षी लक्ष्मण माने सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला हिने पटकाविला.इयत्ता ११वी १२ वी गट जिल्ह्यास्तरीय  वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमार विश्वतेज मारुती जाधव न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी द्वितीय क्रमांक कुमार  तनिषा लक्ष्मण आलदर कोळा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज कोळा तृतीय क्रमांक  कुमार समर्थ रमेश बंडगर दयानंद कॉलेज कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर चतुर्थ क्रमांक कुमारी श्रुती अनिल बनकर न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला 
पाचवा  क्रमांक फक्त सांगोला तालुका  स्पर्धकासाठी कुमारी रेवती संग्राम बाबर  नाझरा विद्यामंदिर जुनिअर कॉलेज नाझरा  हिने पटकाविले.
 वरील तिन्ही गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना  परीक्षक यांचे शुभहस्ते व प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण कार्यक्रमांमध्ये  प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह,रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव म.शं  घोंगडे, संस्था कार्यकारिणी सदस्य दिंगबर जगताप प्राचार्य भीमाशंकर पैलवान,नारायण विसापूरे, अमोल गायकवाड, सरिता लिगाडे ,उदय बोत्रे , सिमरन काझी ,उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे,उपप्राचार्य गंगाधर घोंगडे ,पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभीषण माने, पोपट केदार उपस्थित होते..
   परीक्षक म्हणून प्राचार्य हरिदास रणदिवे, विठ्ठलराव साळुंखे, घनश्याम चौगुले, सोमनाथ गायकवाड,शहाजी देशमुख,प्रा.सविता दूधभाते यांनी  काम पाहिले‌. सर्व परीक्षकांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधून बहुसंख्य विद्यार्थ्यांनी  सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धा  कोड क्रमांक पद्धतीने  पात्रता फेरीनुसार घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच स्पर्धक विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना जेवण व परगावच्या स्पर्धकांना एकेरी प्रवास खर्च आयोजकांकडून देण्यात आला.
  कार्यक्रमास  प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धक विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, पालक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य भीमाशंकर पैलवान  यांनी केले .सूत्रसंचालन  उन्मेष आटपाडीकर यांनीह तर आभार प्रदर्शन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages