कै. बाळासाहेब कोरके यांच्या ६५ व्या जयंतीनिमित्त जामगावात कुस्ती स्पर्धा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 26, 2022

कै. बाळासाहेब कोरके यांच्या ६५ व्या जयंतीनिमित्त जामगावात कुस्ती स्पर्धा

 कै. बाळासाहेब कोरके यांच्या ६५ व्या जयंतीनिमित्त  जामगावात कुस्ती स्पर्धा




वैराग (कटूसत्य वृत्त):- जामगाव (ता. माढा) येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीने शिक्षणमहर्षी कै. बाळासाहेब कोरके यांच्या ६५ व्या जयंतीनिमित्त शालेय मुलांच्या कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. कुस्तीच्या आखाड्याचे उद्घाटन जुनेद शेख यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक उज्जेश करडे उपस्थित होते. ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी बालाजी देवकर, पांडुरंग कानगुडे, संजय माळी, सुनिल गुंड, बळी डोईफोडे, भागवत माळी, शिवाजी कडकदौंड, सागर पाटील, सचिन गवळी, उस्मान मुजावर आदी उपस्थित होते.स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी, मुख्याध्यापक जयराम मोटे, सिध्देश्वर पावले, हनुमंत उकरंडे, बाळासाहेब कापसे, ज्ञानदेव डुकरे,दत्तात्रय टोणपे,नागनाथ पांढरमिसे, बाबुराव करनवार, बलभिम कांबळे,प्रताप कंगले,आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भीष्माचार्य ढवण यांनी केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages