राष्ट्रीय स्वराज्य सेना माविआ घटक पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भाजपा सोबत जाण्याचे स्पष्ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

बोरघर / माणगाव (कटुसत्य वृत्त): ठाकरे सरकारच्या माविआ. तील मुख्यपक्ष असलेल्या शिवसेनेतील काही आमदार फुटल्याने ना. मुख्यमंत्री शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यांवर ठामपणे उभे राहून आपल्या साथीदारांसह भाजपा सोबत जाऊन शिंदे सरकार उभे केल्याने, व आमदार पळवा पळवी ने सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापल्याने व मविआ. सरकारने धोक्यात ठेवून घटक पक्षांना जनतेसारख्या भूल थापा देत अडीच वर्षे झोपेत ठेवल्याने नाराज झालेले राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मराठी माणसाच्या मताचे विभाजन होऊ नये व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्रातील येणाऱ्या तत्सम निवडणुकीत दिनाक रोजी भारतीय जनता पार्टी चे मुंबई येथील प्रदेश कार्यालयात जाऊन मुंबई महानगरपालिकेत व विधानसभा , लोकसभा -२०२४ साठी मा. श्री प्रवीणजी दरेकर साहेब यांच्या मार्गदर्शनात भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष- मा.श्री.चद्रशेखर बावनकुळे साहेब यांना राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकीय पक्ष) महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या घटक पक्षा चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल साहेब यांनी जाहीर लेखी पाठिंबा दिला.
त्यावेळी राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विकास बागल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पोपट फुकटे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बुणे,जालना जिल्हा अध्यक्ष काशिनाथ टेकाळे, जळगांव जिल्हाध्यक्ष राहुल मराठे व जालना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी,ठाणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शंकर हनुमंत चव्हाण,मुंबई अध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, व मुंबई चे प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्रातील निवडणुकीत मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब व मा .श्री आशीष शेलार साहेब यांच्या आदेशाने योग्य ते अपेक्षित काम होईल असे राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांनी विश्वास दाखवत आपल्या पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.
No comments:
Post a Comment