मराठा सेवा संघामुळे खरा इतिहास समाजासमोर आला - संजयमामा शिंदे


मराठा भुषण पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र दास सन्मानित
कुर्डूवाडी (कटुसत्य वृत्त):- समाजातील भुषणावह व्यक्तींचा सन्मान मराठा सेवा संघ करत असून ते कौतुकास्पद आहे. मराठा सेवा संघाने इतिहास पुनर्लेखनाचे मोठे काम केल्याने खरा इतिहास समाजासमोर आल्याचे प्रतिपादन आ.संजयमामा शिंदे यांनी केले.
मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापनदिना निमित्त माढा तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने माढा तालुका मराठा भुषण पुरस्कार,प्रबोधनात्मक व्याख्यान व समाजातील गुणवंतांचा सन्मान सोहळा कुर्डूवाडीतील संकेत मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजयमामा शिंदे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य रंगभूमी परीनिरिक्षण मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ.महेंद्र कदम होते.ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.राजेंद्र दास यांना मराठा सेवा संघाचा पहिला मानाचा माढा तालुका मराठा भुषण पुरस्कार आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी शिवजन्मोत्सव स्पर्धेतील विजेते,लोकसेवा व राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा,समाजातील यशस्वी उद्योजकांचा,गुणवंत कर्मचाऱ्यांचा,तानुबाई बिर्जे पत्रकार सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मराठा सेवा संघाचे योगदान या विषयावर संभाजीनगर येथील व्याखाते डॉ.बालाजी जाधव यांचे व्याख्यान झाले.यावेळी बोलताना मराठा भुषण पुरस्कार प्राप्त डॉ.राजेंद्र दास यांनी मराठा सेवा संघाचे आभार मानत,समाजातील सधन वर्गाने गरीब वर्गाला मदत करत समतोल साधण्याचे काम करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ.महेंद्र कदम यांनी,अॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी नोकरदार वर्गाचे संघटन करून मराठा समाजात प्रबोधनाचे मोठे काम केल्याचे सांगत ही चळवळ माढा तालुक्यात मराठा सेवा संघ व त्यांचे कक्ष चांगले पद्धतीने वाढवत असल्याचे सांगितले.याप्रसंगी राज्य कर विभागाचे सहाय्यक आयुक्त नितेश कदम,महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव,पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सुरजाताई बोबडे,संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिनेश जगदाळे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,उद्योग कक्ष जिल्हाध्यक्ष दत्ताजी शिंदे,कृषीभुषण दादासाहेब पाटील, कर्मयोगी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे,मराठा सेवा संघ जिल्हा परिषद कक्षाचे अध्यक्ष अविनाश गोडसे,सचिन खुळे,उद्योजक गोरख खटके-पाटील,जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष निताताई खटके,रत्नमाला शिंदे,संजीवनी बारबोले,शारदा शिंदे जिजाऊ ब्रिगेड कुर्डूवाडीच्या अध्यक्ष अरूणा पाटील,सारिका भांगे,मनिषा गाडे,उषा ढेकळे,विद्या देशमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी केले.यासाठी तालुकाध्यक्ष निलेश देशमुख,कार्याध्यक्ष शिवाजी गवळी,उपाध्यक्ष रामभाऊ मिटकल,संघटक अरूण जगताप,कुर्डूवाडी शहराध्यक्ष सचिन महिंगडे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment