सांगोला ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा ज्येष्ठ नागरिकांशी उद्धटपणा... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, September 25, 2022

सांगोला ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा ज्येष्ठ नागरिकांशी उद्धटपणा...

सांगोला ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा ज्येष्ठ नागरिकांशी उद्धटपणा...

बूस्टर डोसच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रशासनाचा हलगर्जीपणा

                सांगोला (कटुसत्य वृत्त): कोरोनाने सर्व नागरीकांना हैराण केले आहे. सद्य परिस्थितीत जरी कोरोनाचा प्रसार थांबला असला तरी, कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करताना ज्येष्ठ नागरिक सजगपणा दाखवित आहेत.पण ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी मात्र असंवेदनशील आणि हलगर्जीपणा करीत असल्याचे दिसून येत आहे.तसेच त्यांच्याशी उध्टपणाचे वर्तन करीत असल्याने  ज्येष्ठ आणि सजग नागरीकांना मात्र याचा नाहक त्रास होत आहे.ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाला या बाबतीत कल्पना दिली असता, थातुर मातुर उत्तरे देवून वेळ मारून नेली.

                सांगोला ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधांचा तुटवडा आहे. अनेक नागरिक  अधीक्षकांच्या कामावर नाराज आहेत. मागील काही दिवसांपासून अधीक्षक असणारे डॉ.फुले हे कोरोना लसीकरणात दुर्लक्ष करताना दिसत आहेत. सद्या सांगोला ग्रामीण रुग्णालयात दर शुक्रवारी बूस्टर डोस देण्याची व्यवस्था केली आहे. पण आरोग्य कर्मचाऱ्यांना सकाळी 10 ला बूस्टर डोस सुरु करायची वेळ असताना हे कर्मचारी मात्र वाटेल तेव्हा लशीची मात्रा उघडुन आपण किती कार्यतत्पर आहेत,याचा नुमना सर्व सामान्यांना दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. बूस्टर लशीची मात्रा  आरोग्य सेविका देत आहेत. आणि त्यांचेच वर्तन हे ज्येष्ठ नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.याच आरोग्य सेविका ज्येष्ठांना काडीमात्र किंमत न देता मोठ्या आवाजात एकप्रकारे दाब देवून रागराग करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. महिला आरोग्य सेविका आसल्याने ज्येष्ठ नागरिक  त्यांच्या तोंडी न लागता निघून जात आहेत. दोन दोन तास लोकांना ताटकळत ठेवून या आरोग्य सेविका आपल्याच आविर्भावात चकरा मारतात.या वेळात ज्येष्ठांना माञ ग्रामीण रुग्णालयातील अस्वच्छतेचा त्रास आणि डासांचा सामना करावा लागत आहे.  आरोग्य विभागांचे नियम धाब्यावर बसवून मर्जीने कामे करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

                दर शुक्रवारी दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोस साठी अगोदर आठ दिवस आरोग्य विभागाकडून डोस घेण्यासाठी या असा निरोप दिला जातो.पण प्रत्यक्षात लाभार्थी गेल्यानंतर मात्र दोन दोन तास ताटकळत उभे ठेवून "आता नाही, तासाभराने या, अजून इतर लाभार्थी आले नाहीत, आल्यानंतर या, मर्जीतील लोकांना मात्र VIP ईलाज सर्व नियम धाब्यावर बसवून दिले जात असल्याच्या घटना घडत आहेत.अशा बेशिस्त आणि लसीकरणाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आणि आरोग्य प्रशासनाच्या विरोधात सामाजिक संघटना लवकरच आवाज उठविणार आहेत.

"आरोग्य कर्मचाऱ्यांचे आओ जाओ घर तुम्हारा "

                बूस्टर डोस घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दहा वाजता बूस्टर लशीची मात्रा घेण्यासाठी बोलविले जाते. नागरीक मोठ्या आशेने सकाळी नऊ वाजता जेवण करून येतात. मात्र थांबून थांबून त्यांना लशीची मात्रा दुपारी बारा वाजता देत असल्याने वयोवृध्द नागरीकांना पुन्हा काही तरी खावे लागते. ऑक्टोबर हिटच्या उन्हाचा तडाखा आणि त्यात लशीची मात्रा हे समीकरण ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी मारक आहे, कारण या

                वेळात ज्येष्ठांना  ग्रामीण रुग्णालयातील अस्वच्छतेचा त्रास आणि डासांचा सामना होवून घरी जावून आजारी पडत आहेत. मात्र याचे गांभीर्य आरोग्य विभागाच्या प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने या पहावे, असा सल्ला नाव न सांगण्याच्या अटीवर आरोग्यतज्ञाने सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages