बेगमपुर येथिल शंभू टेक्सटाइलच्या वतीने १०० झेंडे व ५० बिल्ले नूतन विद्यालयात फ्रीमध्ये वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 11, 2022

बेगमपुर येथिल शंभू टेक्सटाइलच्या वतीने १०० झेंडे व ५० बिल्ले नूतन विद्यालयात फ्रीमध्ये वाटप

बेगमपुर येथिल शंभू टेक्सटाइलच्या वतीने १०० झेंडे व ५० बिल्ले नूतन विद्यालयात फ्रीमध्ये वाटप

                घोड़ेश्वर (कटूसत्य वृत्त):- अल्पवधितच बेगमपुर व परिसरात नावारूपास आलेल्या शंभू टेक्सटाइल्स व साडी डेपोचे मालक तुकाराम पूजारी व सोमनाथ पुजारी यांनी आपण ही समाजाचे काहितरी देने लागतो या उक्ती प्रमाणे, व्यापार म्हणजे नुसता नफाच कमविने हा उद्देश नसून आपन ही या समाजासाठी काहितरी करावे या प्रेरणेने आज बेगमपुर येथिल प्रसिद्ध व्यापारी तुकाराम पूजारी व सोमनाथ पुजारी यानी भारत देशाला स्वतंत्र मिळून ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने या स्वतंत्राच्या अमृत महोत्सवाअंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधित ‘हर घर झेंडा’ या उपक्रमासाठी नूतन मराठी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी १०० तिरंगा झेंडे व ५० बिल्ले फ्री मध्ये विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता औताडे यांच्याकड़े देन्यात आले, नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असनार्या पूजारी बंन्धुचे मुख्याध्यापिका सुनीता औताडे यानी आभार मानले यावेळी पुजारी कुटुंबीय चि. वेदांत, विनायक, हर्ष, उन्नती  व ह. भ. प. विष्णुपंत सिद्राम पुजारी (महाराज) व त्यांचे चिरंजीव शंभू टेक्सटाइल्स मार्केट व साडी डेपोचे मालक प्रो. प्रा. तुकाराम विष्णुपंत पूजारी व सोमनाथ विष्णुपंत पुजारी, किशोर देशमुखे, अभिजीत कोकरे, संदीप माळी, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages