डॉक्टर तर्फे रुग्णाला दिलेला धीर व शाब्बासकी त्याचे आयुष्य वाढवते - संतोष अनभुले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 11, 2022

डॉक्टर तर्फे रुग्णाला दिलेला धीर व शाब्बासकी त्याचे आयुष्य वाढवते - संतोष अनभुले

डॉक्टर तर्फे रुग्णाला दिलेला धीर व शाब्बासकी त्याचे आयुष्य वाढवते - संतोष अनभुले

                बेंबळे (कटुसत्य वृत्त): डॉक्टर तर्फे रुग्णाला दिलेला धीर व शाबासकी ही त्या रुग्णाचे आयुष्य वाढवत असते असे महत्त्वपूर्ण विचार ढवळसचे माजी सरपंच संतोष अनभुले यांनी व्यक्त केले आहेत ,माढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळनेर येथे रुग्ण कल्याण समितीच्या बैठकी प्रसंगी अध्यक्षपदावरून अनभुले बोलत होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी थोरात, माढा तालुका शिक्षण विभागाचे प्रतिनिधी  भाऊराव शिंदे, डॉक्टर प्रमोद बोडके,डॉ. बोबडे, डॉक्टर ढवळे, माजी सरपंच दत्तात्रय खंडागळे ,डॉक्टर पवार ,भोसले ,मिनीनाथ गोसावी असे मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. या आरोग्य केंद्रामधे बोअर मोटार फिल्टर बसवणार असून रुग्णासाठी मोठा हॉल बांधण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी चिल्ड्रन पार्क उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संतोष अनभुले यांनी याप्रसंगी सांगितले,तसेच या सर्व कामासाठी आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांचे फंडातून  वीस ते पंचवीस लाख रुपये निधी निश्चितपणे उपलब्ध करून आणू असेही ठाम प्रतिपादन अनभुले यांनी केले. यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शिवाजी थोरात म्हणाले की आरोग्य केंद्राचे छत ,कर्मचाऱ्यांची निवासस्थाने पावसाळ्यात गळत आहेत, त्याच्या दुरुस्तीसाठी रुग्ण कल्याण समितीने पाठपुरावा करावा तसेच येथील सर्व स्त्री पुरुष डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवावी व तालुक्यातील आदर्श आरोग्य केंद्र म्हणून नावलौकिक मिळवावा. कोरोना काळात या आरोग्य केंद्राने खडतर व उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंचायत राज्य समितीच्या पथकाने या आरोग्य केंद्राचा सन्मान केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमास आरोग्य केंद्रातील सर्व स्त्री पुरुष कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते,  डॉक्टर बोबडे यांनी सर्वांचे आभार मानले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages