टेंभुर्णी येथील ब्रह्माकुमारी केंद्रात रक्षाबंधन साजरे... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 11, 2022

टेंभुर्णी येथील ब्रह्माकुमारी केंद्रात रक्षाबंधन साजरे...

टेंभुर्णी येथील ब्रह्माकुमारी केंद्रात रक्षाबंधन साजरे...



                 बेंबळे (कटुसत्य वृत्त): टेंभुर्णी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात रक्षाबंधन साजरे करण्यात आले .सर्वप्रथम ब्रह्माकुमारी अनिताबहेन यांनी ज्ञान मुरलीचे वाचन करून रक्षाबंधनाचे महत्त्व व बहिण भावा मधील अतूट पवित्र प्रेमाचे नाते व यामागील सामाजिक आत्मीयता व कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले, तसेच त्यांनी रक्षाबंधन संदेशाचे वाचन व विवेचन करून मार्गदर्शन केले .यानंतर उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींना त्यांनी व सायलीबेहेनजी यांनी औक्षण करून राख्या बांधल्या व शिव परमात्म्याचे आशीर्वाद वरदान प्रदान केले .याप्रसंगी त्यांना हेमाबहेनजी व पूजा बहेनजी यांनी सहाय्य केले. या कार्यक्रमास सुभाष चव्हाण ,विलास चव्हाण, कुलकर्णी काका ,राजकुमार भरघंडे, मुकुंद रामदासी ,नारायण लोकरे यांचे सह टेंभुर्णी ,शिराळ, बेंबळे इत्यादी ठिकाणचे नागरिक उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages