देशभक्तीने भारावलेल्या 5 हजार नागरिकांचा तिरंगा रॅलीत सहभाग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 11, 2022

देशभक्तीने भारावलेल्या 5 हजार नागरिकांचा तिरंगा रॅलीत सहभाग

देशभक्तीने भारावलेल्या 5 हजार नागरिकांचा तिरंगा रॅलीत सहभाग

तरुणाईच्या बाईक रॅली मुळे संपूर्ण माळशिरस तालुक्यात देशभक्तीमय वातावरणाची निर्मिती

                 सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माळशिरस अकलूज या भागातील नागरिकांमध्ये विशेषत: या भागातील तरुण पिढी मध्ये राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी माळशिरस तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातून दोन तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पाच हजार नागरिकांनी सहभाग घेतला व संपूर्ण तालुक्यात देशभक्तीमय वातावरणाची निर्मिती केली.

                 स्व. शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना व अन्य सहकारी संस्थेच्या माध्यमातून तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस आजादी का अमृत महोत्सव सोहळा समिती अकलूजचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील व कार्याध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला. भारत माता की जय, वंदे मातरम्, इंनक्लाब जिंदाबाद च्या जयघोषात व देशभक्तीच्या वातावरणात तरूणाईच्या सळसळत्या जोशात 86 कि.मी. ची अडीच हजार मोटरसायकल स्वार तिरंगा रॅली संपन्न झाली. या रॅलींचे संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साही व देशभक्तीच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. मोटारसायकलवर लावण्यात आलेल्या तिरंगा झेंड्यामुळे संपूर्ण रॅली मार्ग तिरंगामय झाला होता.

                 ही रॅली शंकरनगर, सदुभाऊ चौक, माळीनगर, 25/4, महाळूंग, श्रीपूर, बोरगांव, माळखांबी, बोंडले, वेळापूर, खंडाळी, माळेवाडी, प्रतापसिंह चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक, सदुभाऊ चौक मार्गे विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे पोहोचली. माळशिरस तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातून आलेल्या दोन्ही रॅली अकलूज येथील क्रिडा संकुलात पोहोचल्यानंतर या रॅलीचा प्रवाह एका मोठ्या तिरंगारुपी महासागरात रूपांतरित झाला होता.

                 "आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त केंद्र शासन आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात राबवित आहे. त्याच अनुषंगाने माळशिरस -अकलूज या भागातील तरुण पिढी मध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण करणे व बलशाली राष्ट्र निर्मितीमध्ये तरुणाईचा सहभाग घेणे व या भागातील नागरिकांमध्ये जाज्वल राष्ट्रभक्ती निर्माण करणे यासाठी माळशिरस तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागातून दोन तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते."' - धैर्यशील मोहिते पाटील कार्याध्यक्ष, स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सोहळा समिती, अकलूज

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages