महाविकास आघाडी फुटीचे संकेत...कॉंग्रेस नाराज?

मुंबई, (नासिकेत पानसरे):- राज्यातील सत्ता संघर्षानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी राज्यात राहील का,असा प्रश्न सातत्याने उद्भवतो.अशातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पदी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची निवड केल्या नंतर आम्हाला विचारात घेतले नाही त्यामुळे आघाडीत राहायचं का याचा विचार करावा लागेल असे संकेत दिले आहेत.
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्तेत असताना मविआतील तिन्ही घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात फारशे काही चांगले होते असे नाही.कारभार शिवसेना आणि राष्ट्रवादी करीत आहेत काँग्रेसला मात्र अलिप्त असल्याची भावना होती.आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने परस्पर अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतप्त झाले आहेत.निर्णय प्रक्रियेत विचारात घेतले जात नसेल तर,आघाडीत राहायचे की नाही याचा विचार कारावा लागेल असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले आहे. महाविकास आघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही, एका विपरीत परिस्थितीत उभी राहिलेली आघाडी असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आल्यानंतर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला हवे होते. मात्र शिवसेने अंबादास दानवे यांची निवड केली आणि त्यांच्या नियुक्तीचे पत्रच थेट देण्यात आले. त्यामुळे काँग्रेस नाराज झालेली आहे. हा निर्णय घेताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही विचारात घेतले गेले नसल्याने दोन्ही पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले ही आघाडी विपरीत परिस्थितीत झालेली आहे.राज्याच्या जनतेच्या हितासाठी त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला.आम्ही सत्तेत नव्हतो.विरोधी पक्षात बसण्याची आमची तयारी होती.त्यांनी पहाटेचा शपथविधी केला. तेव्हा २०१९ पासून राज्यात महाभारत घडते आहे. महाराष्ट्राची बदनामी भाजपा करते आहे. जनतेने त्यांना पहिल्यांदा १०५ भाजपाचे आमदार निवडून दिले पण यांनी लोकशाहीचा तमाशा केला आहे. यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. विपरीत परिस्थितीत आमची आघाडी झाली होती,
या संदर्भात अशोक चव्हाण यांना विचारले एसता ते म्हणाले की,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांचा निर्णय पक्षाचा असतो. त्यांचा निर्णय सगळ्यांना मान्य असेल.असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. विधिमडंळ गटनेते बाळासाहेब थोरात आहेत. पटोले आणि थोरात जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की,मोठे पक्ष असल्याने अनेक नेते प्रतिक्रिया देत असतात असे वक्तव्य विरोधी पक्षनते अजित पवार यांनी केले आहे. सद्यस्थितीत विधिमंडळात काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आहेत. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत अशोक चव्हाण आणि अमिन पटेल आहेत. या ठिकाणी विरोधकांमध्ये सामंजस्य असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना या बाबत विचारणा केली असता त्यांनी पटोले यांचे वक्तव्य ऐकले नसल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांच्या निवडीबाबत विचारात घेतले नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment