ग्रंथालय संचालक पदावर दत्तात्रय क्षीरसागर यांची नेमणूक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 12, 2022

ग्रंथालय संचालक पदावर दत्तात्रय क्षीरसागर यांची नेमणूक

 ग्रंथालय संचालक पदावर दत्तात्रय क्षीरसागर यांची नेमणूक



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ग्रंथालय संचालक पदाचे नेमणुकीसाठी राज्यातील 22 जणांचे मुलाखती 1 व 2 ऑगस्ट रोजी घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील महूद येथील व साहाय्यक ग्रंथालय संचालक पदावर पुणे येथे कार्यरत असलेले दत्तात्रय क्षीरसागर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ग्रंथालय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.त्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ पुणे विभागाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे व उपाध्यक्ष धोंडिराम जेवूरकर यांनी दत्तात्रय क्षीरसागर यांचे अभिनंदन केले आहे. राज्यातील ग्रंथालय कर्मचारी यांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी दत्तात्रय क्षीरसागर हे शासन दरबारी नक्कीच काम करतील असेही बेडगे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages