स्वातंत्र सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांच्या वारसांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य - माजी आमदार राजन पाटील


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सोलापूर जिल्हासह मोहोळ तालुक्याने फार मोठे योगदान दिलेले आहे. अनेकानी आपल्या प्राणाचे मोल दिले आहे. त्यांचे स्मरण आपल्या मनात कायम राहण्यासाठी व देश अभिमान जागृत राहण्यासाठी असे कार्यक्रम सातत्यांने होणे आवश्यक असल्याचे मत माजी आमदार राजन पाटील अनगरकर यांनी व्यक्त केले.
श्री. संदीपान दादा गायकवाड बहुउद्देशीय संस्था व मोहोळ नागरी सहकारी पतपुरवढा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोहोळ तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा कृतज्ञ सोहळा, त्यांच्या वारसांचा सन्मान व हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रध्वज प्रदान कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजन पाटील बोलत होते.
पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मोहोळ तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातील एक तरी व्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढली असल्याची नोंद इतिहासात आढळत असल्याने मला या तालुक्याचा अभिमान आहे. स्वातंत्र सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांच्या वारसांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. अशा प्रकाराचा कार्यक्रम जिल्ह्यातच काय राज्यातही झाल्याचे माझ्या निदर्शनास आले नाही.
स्वतंत्र्य सेनानी संदीपान दादा गायकवाड मंगल कार्यालय मोहोळ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. कौशिक तात्या गायकवाड प्रास्ताविक करताना सांगितले की, संस्थेचे व आमचे मार्गदर्शक माजी आमदार राजन पाटील यांचे संकल्पनेतून हा घेण्यात आला. देशासाठी जे हौतात्म्य झाले आहेत त्यांचे स्मरण होऊन तरुणाई मध्ये एक चेतना निर्माण होण्याची गरज आहे. स्वतंत्र सैनिकाचे स्मरण करण्यासाठी त्यांच्या आदर्शाची माहिती सर्वाना व्हावी म्हणुन त्याच्या वारसांचा सत्कार करणे उचित ठरेल अनेकाच्या बदिलानाने अनेकच्या त्यागामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले ते टिकवुन ठेवण्याची जबाबदारी तुमची आमची असल्याचे गायकवाड यांनी शेवटी सांगितले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर म्हणाले की, जिल्हा प्रशाननाने सहा लाख झेंडे वाटप करण्याचे उद्दीट ठेवले आहे. त्याला श्री. संदीपान दादा गायकवाड बहुउद्देशीय संस्था व मोहोळ नागरी सहकारी पतपुरवढा संस्थाने योग्य प्रतिसाद देऊन संपूर्ण व अनमोल असे सहकार्य केले आहे. असेच सर्वांनी सहकार्य करण्याचे अवाहनही शेवटी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी केले.
व्यासपीठावर तहसीलदार प्रशांत बेडसे, मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, दुय्यम निबंधक फुलचंद लिबांळकर, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब गायकवाड, डॅा.सौ.स्मिता पाटील, शुभांगी लंबे, उद्योजक वैभव गुंड व दैनिक कटूसत्य व वृत्तदर्पण न्यूज चॅनलचे संपादक पाडुरंग सुरवसे आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मोहोळ तालुक्यातील आत्तार चाॅदसाहेब कोंडाही, अतकरे जनार्दन बंडोबा, आंडगे प्रल्हाद तुकाराम, इंगोले भगवान रघोजी, कस्तुरे मोतीचंद आदिनाथ, कस्तुरे सुरेंद्र आण्णाराव, कंगळे भगवान गणपती, कंगळे दिगंबर विद्यानंद, कंगळे विद्यानंद गोविंद, काकडे नामदेव महादेव, काटकर श्रीरंग धोंडी, कारंडे रंगनाथ दगडू, कुलकर्णी यशवंत नरहर, कोठाडिया हिराचंद सखाराम, कोठारी विलास माणिकचंद, गरड संभाजीराव रामचंद्रराव, गवळी बाबुराव नागनाथ, गायकवाड आप्पा येदू, गायकवाड दत्तात्रय गोविंदराव, गायकवाड दिगंबर श्रीपती, गायकवाड नामदेव दिगंबर, गायकवाड पंडित ताऊराव, गायकवाड पंढरीनाथ यशवंतराव, गायकवाड भिमराव श्रीपतराव, गायकवाड संदिपान प्रल्हाद, गायकवाड श्रीपती कुशाबा, गायकवाड ज्ञानेश्वर दाजी, गुमते अनंतराज सुमतीनाथ, गुमते त्रिबंक रुकबदास, गुमल बाळकृष्ण नागेश, गुरव शामराव सौदागर, गुंड किसन दत्तात्रय, गुंड तानाजी सखाराम, गुंड नामदेव दत्तात्रय, घोंगडे दगडू आप्पाराव, घोंगडे रेवणसिद्ध आण्णा, जगदाळे चतुर कोंडीबा, जाधव रामचंद्र विठ्ठल, जोके आदिनाथ बाबू, जोशी गंगाधर श्रीनिवास, जोशी श्रीनिवास कृष्णा, झेंडगे रामभाऊ राऊ, डोलारे रामचंद्र एकनाथ, ढेरे चंद्रभान नामदेव, ढेरे विनायक गणपत, ताकभाते बाबूराव बलभीम, दिक्षीत भालचंद्र नरसिंह, देव्हरे शाम सिद्धरामप्पा, देशपांडे कृष्णाजी रघुनाथ, देशपांडे विनायक गणेश, दोशी हिरालाल माणिकचंद, नवले मनोहर निवृत्ती, माने नरसू नारायण, पाटील गोपाळ संभाजी, पाटील जनार्दन यशवंतराव, पाटील बापू रशिद, पाटील यशवंतराव आमगोंडा, पाटील रंगनाथ आबाजी, पाटील लिंबाजी नरसिंगराव, पुराणिक आप्पाराव गुरुसिद्धप्पा, पोतदार दत्तात्रय दामोदर, बरकडे तायाप्पा गणपती, बागवान इस्माईल सजन, भुसारे आदिनाथ गणपत, भोसले गजेंद्र बाबुराव, भोसले भागवत विश्वनाथ, भोसले मनोहर सिताराम, भोसले संभाजी रामचंद्र, भोसेकर बाबूराव बापूराव, माळी शंकर धोंडी, लामगुंडे बाबूराव काशीनाथ, लेंगरे मारुती चिंतु, व्यवहारे लिंबाजी भिवाजी, व्यवहारे सारंगधर रामजी, वागज सुखदेव लिंबाजी, वाघमारे खंडेराव सावळाराम, वायचळ सदाशिव नागनाथ, शहा जीवराज गुलाबचंद, शिरसाट बाबू अर्जुन, शिरसाट हरिदास तुकाराम, शिंदे चांगदेव सदाशिव, शिंदे त्र्यंबक आप्पाराव, शेख गुलाब साहेबराव, सगर दत्तात्रय धोंडीबा, साखरे भानुदास बाबुराव, साबळे बापूराव सिद्रमप्पा, साळुंखे मल्लिकार्जुन निवृत्ती, सुतार तुकाराम दत्तू, सुतार रघुनाथ बाळू, हैदळे वसंत कोंडीबा, क्षीरसागर निवृत्ती कृष्णकांत, क्षीरसागर ज्ञानदेव कृष्णा या 100 स्वतंत्र सैनिक व यांच्या वारसांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होत. सूत्रसंचालन श्वोता हुल्ले यांनी केले. राकेश देशमाने, शिवाजी दळवी, प्रमोद डोके, मुस्ताक शेख, राजेश खपाले, श्रीकांत गायकवाड, हरिभाऊ कोरे, मोहन व्हनमाने, सतिश भोसले , जगन्नाथ कोल्हाळ , राजू गायकवाड, अभिजीत गायकवाड, महावीर चटके, दिलीप पाटील, भाऊसाहेब गायकवाड, शैलेश गावडे, शुभम माने, अनिल नाईक, सुरेश घाटगे, राजरत्न गुंड, संतोष भोसले, चंद्रकांत वाघमोडे, आदी सह बहुसंख्येने उपस्थित होत.
No comments:
Post a Comment