ऍट्रॉसिटीतील आरोपींना अटक न केल्यास ८ ऑगस्टला भव्य मोर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 4, 2022

ऍट्रॉसिटीतील आरोपींना अटक न केल्यास ८ ऑगस्टला भव्य मोर्चा

ऍट्रॉसिटीतील आरोपींना अटक न केल्यास ८ ऑगस्टला  भव्य मोर्चा

                 अकलूज (कटूसत्य वृत्त):- सोमनाथ हुलगे, साजिद सय्यद, राहुल ढेरे, नागेश हुलगे यांनी होलार समाजाचे कर्मचारी संतोष ऐवळे यास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर २२ जुलैला एट्रोसिटी दाखल झाली होती. मात्र जवळजवळ १५ दिवस होत आले तरीही संबंधित आरोपींना अकलूज पोलिसांनी अटक न केल्याने अकलूज येथील समस्त दलित समाजाच्या वतीने दिनांक ८ ऑगस्टला उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

                 विजय मल्टीस्टेटचा कर्मचारी संतोष ऐवळे याने सोमनाथ हुलगे यास थकीत कर्जाच्या हप्त्याबाबत विचारणा केली असता सोमनाथ हुलगे याने त्यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तेथे साजिद सय्यदही आला आणि ‘हे होलारडं मोहिते पाटलांच्या जीवावर लय उड्या मारतंय’, असे म्हणत तेथे पडलेल्या काठीने संतोष ऐवळे याच्या लवणीत मारले, तर नागेश हुलगे व राहुल ढेरे यानेही त्यास मारहाण करण्यास सुरूवात करताच संतोष ऐवळे तेथून आपला जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा करत पळाला. त्यामुळे अकलूज पोलिस स्टेशनला दिनांक २२/०७/२०२२ रोजी त्यांच्यावर भादंवि कलम ३२७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अन्वये ३(१)(r)(s), ३(२)(va) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन आज जवळजवळ १५ दिवस झाले, तरीही अकलूज पोलिसांनी सदरच्या आरोपींना अटक केलेली नाही. दलिताला भर दिवसा मारहाण करून जातीयवादी शिवीगाळ करूनही एट्रोसिटी एक्टबाबत अकलूज पोलिस प्रशासन गंभीर नसल्याचे पाहून अकलूजमधील समस्त दलित बांधवांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून सदरच्या आरोपींना अकलूज पोलिसांनी तात्काळ अटक न केल्यास दिनांक ०८ ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयावर समस्त दलित समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी दलित समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages