सोलापूरचे उदय उमेश लळित होणार सुप्रीम कोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 4, 2022

सोलापूरचे उदय उमेश लळित होणार सुप्रीम कोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश

सोलापूरचे उदय उमेश लळित होणार सुप्रीम कोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरचे उदय उमेश ललित भारताचे नवीन सरन्यायाधीश होणार आहेत. सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी ललित यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून केली आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाकडे ही शिफारस करण्यात आली आहे. याच महिन्यात एन. व्ही. रमण्णा निवृत्त होणार आहेत.

              भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून सोलापूरचे सुपुत्र उदय उमेश लळित हे नामनिर्देशित झाले असून, ऑगस्टमध्ये ते पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.  

              सोलापुरातील मानांकित ह.दे. प्रशालेचे माजी विद्यार्थी उदय उमेश लळीत देशाचे सरन्यायधीश होणार असून समस्त सोलापूरकरांसाठीही अभिमानास्पद आहे.

              देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे पुढचे मुख्य न्यायाधीश मनोनित आहेत. न्यायमूर्ती लळीत हे मूळचे सोलापूरचे असून लळीत यांच्या रूपाने देशाच्या न्यायव्यवस्थेतील चौफ जस्टिस ऑफ इंडिया हा सर्वोच्च बहुमान सोलापूरला मिळणार आहे. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

              त्यानंतर लळीत यांची न्यायमूर्तिपदी निवड झाली. त्यांच्या कारकिर्दीत शाहबाने खटल्याचा निकाल विशेष गाजला होता. उदय लळीत यांची चीफ जस्टिसपदी निवड झाल्याचा आनंद आहे. लळीत कुटुंबाची चौथी पिढीदेखील वकिली क्षेत्रात कार्यरत आहे, अशी माहिती सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्या सविता लळीत यांनी माध्यमांना दिली.

उदय लळीत यांच्यविषयी सोलापूरकराच्या तोंडून माहिती

              सोलापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांनी उदय लळित यांच्या संबंधीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की, माझ्या आजोबापासून लळित कुटुंबाचा माने कुटुंबाशी संबंध आहेत. लळित यांनी वकिली क्षेत्रात नाव कमाविले होते. उदय लळित यांचे आजोबा अण्णासाहेब यांना शहरात मानसन्मान होता.

              माझे बंधू कै. तानाजी आणि ॲड. भगवान वैद्य हे १९६९ – ७० साली हरिभाई देवकरण प्रशालेत एका वर्गात शिकत होते. त्यांची मैत्री होती, असेही धनंजय माने म्हणाले. लळित यांचे कुटुंबीय लकी चौक ते हुतात्मा चौक या मार्गावर वास्तव्यास होते. त्यांच्या वहिनी सविता लळित या सोलापूर जनता बँकेच्या चेअरमन होत्या. आता त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील बाजूस समर्थनगर येथे वास्तव्यास असल्याचेही सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages