रियाज हुंडेकरीसह चौघांवर ॲट्रासिटीचा गुन्हा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 4, 2022

रियाज हुंडेकरीसह चौघांवर ॲट्रासिटीचा गुन्हा

रियाज हुंडेकरीसह चौघांवर ॲट्रासिटीचा गुन्हा

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील ७० फूट रोडवरील मस्जिदीच्या बोळात तुंबलेल्या सार्वजनिक गटारीची पाहणी करायला गेल्यानंतर काँग्रेसचे माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी याने तेथील तिघांना गटारीतील मलमिश्रित पाण्याच्या बादल्या अंगावर ओतायला लावल्या. या प्रकरणी महादेव दत्तारत्र शेरखाने या महापालिकेच्या कर्मचाऱ्याने सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार हुंडेकरीसह इतर तिघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

               सोलापूर शहरात मागील काही महिन्यांत ॲट्रॉसिटी गुन्ह्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, २८ जुलैला दुपारी सव्वादोनच्या सुमारास ७० फूट रोडवरील मस्जिदीजवळील गटार तुंबल्याने महापालिकेचे कर्मचारी शेरखाने हे त्याठिकाणी पाहणी करायला गेले होते. त्यावेळी रियाज हुंडेकरी हादेखील तेथे होता. त्याने स्वत: दोन्ही हात पकडून ‘ये क्या है’ म्हणत अनुसूचित जाती-जमातीचा असल्याची माहिती असूनही जाणीवपूर्वक अपमानित करण्याच्या हेतूने तेथील तिघांमार्फत गटारीतील मलमिश्रित पाण्याने भरलेल्या तीन बादल्या ओतल्या. सार्वजनिक ठिकाणी जाणीवपूर्वक अपमानित केले,

               असेही फिर्यादीत नमूद आहे. जबरदस्तीने ते शासकीय काम करायला लावून मारहाण केली. त्या मारहाणीत गटारीत पडून गुडघ्याला जबर मार लागला आहे. सोबत असलेल्या वाहिद शेख या कामगारालाही त्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस आयुक्त माधव रेड्डी तपास करीत आहेत.

पोलिसांकडून शहानिशा सुरु

               अनुसूचित जाती-जमातीतील लोकांना समाजातील कोणत्याही घटकांनी जातीवरून किंवा त्या जातीचा असतानाही जाणीवपूर्वक अपमानित केल्यास अथवा जातिवाचक शिवीगाळ केल्यास ॲट्रॉसिटीअंतर्गत संबंधितावर कडक कारवाई केली जाते. रियाज हुंडेकरीसह अन्य तिघांवर आता तो गुन्हा दाखल झाला आहे. शेरखाने यांच्या अंगावर बादल्या ओतणारे ते तिघे कोण, खरोखर असा प्रकार झाला आहे का, याची शहानिशा सुरु असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages