माळशिरस येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ एस.टी.बस थांबा करण्यात यावा - आ.मोहिते-पाटील
.png)
माळशिरस (कटूसत्य वृत्त):- माळशिरस न्यायालयामध्ये बाहेरगावाहून येणा-या पक्षकारांची संख्या लक्षनिय असून त्यांना माळशिरस बस स्थानकापासून न्यायालयाकडे येण्यासाठी कोणतीही वाहन व्यवस्था उपलब्ध नाही यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरी नागरिकांच्या दळणवळणाच्या सोयीसुविधे करीता पुणे-पंढरपूर रोड नजीक असलेल्या महात्मा फुले पुतळ्या जवळ एस.टी.बस थांबा करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाकडे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली.
माळशिरस बार असोसिएशन यांनी माळशिरस येथील पुणे-पंढरपूर रोड नजीक असलेल्या महात्मा फुले पुतळ्याजवळ एस. टी. बस थांबा होणेबाबत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली होती.या ठीकाणी एस.टी थांबा होणार असल्याने नागरिकांकडून आ.मोहिते-पाटील यांचे अभारव्यक्त केले.
आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार माळशिरस येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ एस.टी. बस थांबा करण्याबाबत संबंधित कार्यालयास सुचित केलेले आहे. तरी त्याअनुषंगाने सदरच्या थांब्याचा कि. मी सर्व्हे करण्यात येत असुन सदरचा सर्व्हे पुर्ण होताच थांबा देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
No comments:
Post a Comment